४० संसार पुन्हा सावरले
By Admin | Updated: July 9, 2014 01:07 IST2014-07-09T01:07:34+5:302014-07-09T01:07:34+5:30
क्षुल्लक कारणावरून कुटुंबात क टुता निर्माण झाली. वाद विकोपाला गेल्याने पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला होता. मंगळवारी रविभवन येथे राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत सामोपचाराने अशा

४० संसार पुन्हा सावरले
महिला आयोगाची सुनावणी : मतभेद दूर केले
नागपूर : क्षुल्लक कारणावरून कुटुंबात क टुता निर्माण झाली. वाद विकोपाला गेल्याने पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला होता. मंगळवारी रविभवन येथे राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत सामोपचाराने अशा कुटुंबांतील मतभेद दूर करण्यात आल्याने ४० संसार पुन्हा सावरले आहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुसीबेन शहा यांच्यासह सदस्या विजया बांगडे व चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत ही सुनावणी घेण्यात आली. आयोगापुढे ८५ प्रकरणे तडजोडीसाठी आली होती. यातील सुनावणीसाठी ठेवण्यात आलेल्या ६६ पैकी ४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. ज्या प्रकरणात समेट झाला नाही, अशी प्रकरणे ४ आॅगस्ट २०१४ च्या सुनावणीत निकाली काढली जाणार असल्याची माहिती विजया बांगडे यांनी दिली. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा, यासाठी महिला व बाल कल्याण विभाग, पोलीस स्टेशन येथील महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न असतो. परंतु समेटानतंरही अन्याय झाल्यास अशा प्रकरणात पीडित महिलेला पोलिसात तक्र ार नोंदविण्याचा सल्ला दिला जातो, अशी माहिती बांगडे यांनी दिली.
पीडित व अन्यायग्रस्त महिलांना आयोगाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या समस्या निकाली काढून न्याय मिळवून दिला जाईल. यासाठी महिलांनी तक्र ार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोगाने केले आहे. ८५ प्रकरणांत प्रामुख्याने कौटुंबिक वादाची प्रकरणे होती. तसेच मालमत्ता, भाडेकरूचा वाद अशीही काही प्रकरणे आयोगापुढे सुनावणीसाठी आली होती.
यावेळी उपजिल्हाधिकारी आशा पठाण, विभागीय महिला बाल विकास अधिकारी एम.जे. बोरखेडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.एल. रामरामे, लक्ष्मण मानकर, भागवत तांबे, प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रजनी कांबळे, विधी सल्लागार अमिता खोब्रागडे, वरिष्ठ समुदेशक अर्जुन दांगट, ए.डी. बांदूरकर यांच्यासह पीडित महिला व गैरअर्जदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)