४० रेल्वेगाड्या रद्द

By Admin | Updated: July 2, 2015 03:22 IST2015-07-02T03:22:29+5:302015-07-02T03:22:29+5:30

इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे नागपूर-इटारसी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

40 trains canceled | ४० रेल्वेगाड्या रद्द

४० रेल्वेगाड्या रद्द

प्रवाशांची गैरसोय : रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत
नागपूर : इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे नागपूर-इटारसी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने २ जुलैला या मार्गावरील २२ रेल्वेगाड्या तर ३ जुलैला १८ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
इटारसी रेल्वेस्थानकाजवळील रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे नागपूर-इटारसी मार्गावरील वाहतूक मागील १५ दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. दरम्यान या मार्गावरील रेल्वेगाड्या सातत्याने रद्द करण्यात येत आहेत. गुरुवारी २ जुलैला या मार्गावरील २२ रेल्वेगाड्या तर ३ जुलैला १८ रेल्वेगाड्या रद्द करण्याची पाळी रेल्वे प्रशासनावर आली आहे. दरम्यान रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांची माहिती देण्यासाठी प्रवाशांना ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक तसेच नागपूर रेल्वेस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
२ जुलैला रद्द करण्यात आलेल्या गाड्या
१२७०८ निजामुद्दीन-तिरुपति एक्स्प्रेस
१२६४३ त्रिवेंद्रम-निजामुद्दीन एक्स्प्रेस
१२६४८ निजामुद्दीन-कोईम्बतूर एक्स्प्रेस
१६०३१ चेन्नई-जम्मूतावी अंदमान एक्स्प्रेस
१२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस
२२४०३ पॉंडेचेरी-नवी दिल्ली एक्स्प्रेस
२२११२ नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस
१२४१० निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस
१८४७३ पुरी-जोधपूर एक्स्प्रेस
११२०३ नागपूर-जयपूर एक्स्प्रेस
१२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस
१२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस
१२९७६ जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस
११२०८ रिवा-नागपूर एक्स्प्रेस
१२६४९ यशवंतपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस
१२७९१ सिकंदराबाद-पटना एक्स्प्रेस
१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस
१२८०७ विशाखापट्टनम-निजामुद्दीन एक्स्प्रेस
१९३०२ यशवंतपूर-इंदोर एक्स्प्रेस
५९३८५ इंदोर-छिंदवाडा पॅसेंजर
५९३८६ छिंदवाडा-इंदोर पॅसेंजर
१२६५० निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस
३ जुलैला रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या
१६०३१ चेन्नई-जम्मूतावी एक्स्प्रेस
१८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस
१२६८७ मदुराई-डेहराडून एक्स्प्रेस
०८२४५ बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस
१२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस
१२८०८ निजामुद्दीन-विशाखापट्टणम एक्स्प्रेस
१२७९२ पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस
१२४०९ रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस
०५०३९ गोरखपूर-क्रिष्णराजपुरम एक्स्प्रेस
२२३५३ पटना-बंगळुर कँट प्रीमियम एक्स्प्रेस
२२६८४ लखनौ-यशवंतपूर एक्स्प्रेस
१६८६३ भगत की कोठी-मन्नारगुडी एक्स्प्रेस
१२२९६ पटना-बंगळुर एक्स्प्रेस
१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस
१८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस
२२१११ भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस
५९३८५ इंदोर-छिंदवाडा पॅसेंजर
५९३८६ छिंदवाडा-इंदोर पॅसेजर

Web Title: 40 trains canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.