४० बसेस आल्या, १५० ची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 16, 2017 02:27 IST2017-02-16T02:27:23+5:302017-02-16T02:27:23+5:30
महापालिकेच्या ‘आपली बस’ या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नवीन वर्षाच्या शुभारंभाला १ जानेवारी २०१७ पासून

४० बसेस आल्या, १५० ची प्रतीक्षा
परिवहन विभागाची तयारी : १५ मार्गांवरून धावणार बसेस
नागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’ या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नवीन वर्षाच्या शुभारंभाला १ जानेवारी २०१७ पासून नागपूर शहरात नवीन ४५ बसेस धावणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु जेमतेम ४० बसेस आल्या आहेत. लवकरच इतर १५० बसेस मिळतील अशी अपेक्षा परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
५ डिसेंबरला ‘आपली बस’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. यात ग्रीन बस व लाल बसेसचा समावेश होता. त्यानंतर बसेसला हिरवी झेंडी देण्यात आली होती. सुरुवातीला प्रवाशांची संख्या अधिक असलेल्या प्रमुख १५ मार्गावरून या बसेस धावणार आहेत. याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने जुन्या व नवीन अशा ४३२ लाल रंगाच्या व ५५ ग्रीन बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ४० बसेस आल्या आहेत. पुढील काही महिन्यात शहरात ४८७ बसेस धावतील असा विश्वास परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)
निवडणुकीनंतर समितीचे बजेट
महापालिका सभागृहाने नवीन परिवहन धोरणाला मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार शहर बस वाहतुकीचे पुनर्नियोजन केले जाणार आहे. बससेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी या विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पहिला अर्थसंकल्प नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहणानंतर मांडला जाणार आहे.