नागपूरसह प्रमुख १० रेल्वे स्थानकावर थ्रीडी सेल्फी बूथ 

By नरेश डोंगरे | Published: October 12, 2023 02:10 PM2023-10-12T14:10:41+5:302023-10-12T14:11:22+5:30

मध्य रेल्वेची कल्पकता : प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

3D selfie booths at major 10 railway stations including Nagpur | नागपूरसह प्रमुख १० रेल्वे स्थानकावर थ्रीडी सेल्फी बूथ 

नागपूरसह प्रमुख १० रेल्वे स्थानकावर थ्रीडी सेल्फी बूथ 

नागपूर : स्वच्छ आणि नीटनेटके रेल्वे स्थानक बनविण्यासह प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मध्य रेल्वेने आता एक नवा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार नागपूरसह दहा प्रमुख रेल्वे स्थानकांवर मध्य रेल्वेने थ्रीडी सेल्फी पॉईंट सुरू केले आहे. या सेल्फी पॉईंट्सला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मध्य रेल्वेने विविध झोनमधील १० प्रमुख रेल्वे स्थानकांवर अ श्रेणी थ्रीडी सेल्फी बूथ तयार केले आहेत. या नाविन्यपूर्ण बूथवर देशातील विविध योजना आणि उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन दिसून येते. आकर्षक अशा या थ्रीडी सेल्फी बूथला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ज्या १० स्थानकांवर विविध थीमसह  सेल्फी बूथ लावले तो विभाग, थिम आणि रेल्वेस्थानक पुढील प्रमाणे आहे.

नागपूर विभाग : नागपूर - डिजिटल इंडिया हम है डिजिटल, हम हैं नया भारत
बैतूल - स्वच्छता एक कदम स्वच्छता की ओर, स्वच्छ भारत

मुंबई विभाग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - स्किल इंडिया स्किल विल झिल. 
 कल्याण - न्यू इंडिया मेडिसिन फोर्स फॉर ग्लोबल गॉड. 

पुणे विभाग: पुणे - डिजिटल इंडिया हम हैं डिजिटल, हम है नया भारत
कोल्हापूर स्किल इंडिया- स्किल विल झिल. 

सोलापूर विभाग : सोलापूर - स्पेस पॉवर नया भारत
कलाबुरगि - नया भारत (घर) आवास की शक्ति

भुसावळ विभाग : जळगाव - नया भारत (जल) हर घर जल-जल जीवन मिशन
नाशिक रोड - गॅस धुएं से मुक्ती -उज्वला की शक्ती. 

Web Title: 3D selfie booths at major 10 railway stations including Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.