केवायसी अपडेटच्या बहाण्याने लिंक पाठवून ३.८४ लाख उडविले
By दयानंद पाईकराव | Updated: March 18, 2023 22:08 IST2023-03-18T22:07:08+5:302023-03-18T22:08:24+5:30
Nagpur News बँक खाते ब्लॉक होणार असून केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून महिलेच्या खात्यातील ३ लाख ८४ हजार ५९९ रुपये ऑनलाईन उडविल्याची घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ मार्चला सायंकाळी ७.५१ ते रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.

केवायसी अपडेटच्या बहाण्याने लिंक पाठवून ३.८४ लाख उडविले
नागपूर : बँक खाते ब्लॉक होणार असून केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून महिलेच्या खात्यातील ३ लाख ८४ हजार ५९९ रुपये ऑनलाईन उडविल्याची घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ मार्चला सायंकाळी ७.५१ ते रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली आहे.
नंदा सुरेश मेश्राम (६०, पुष्कर अपार्टमेंट, इंगोलेनगर, सोनेगाव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या घरी असताना अनोळखी मोबाईल धारकाने त्यांच्या मोबाईलवर कॉल करून तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते ब्लॉक होत असून केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक पाठविली. नंदा यांनी लिंकमध्ये संपूर्ण माहिती भरून ओटीपी टाकला असता आरोपीने त्यांच्या खात्यातील ३ लाख ८४ हजार ५९९ रुपये ऑनलाईन वळते केले. नंदा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.