शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

३८ साक्षीदार तपासले

By admin | Updated: September 29, 2016 02:22 IST

या प्रकरणी मृत सूरजचा भाऊ राजेश अशोक यादव याच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम...

डल्लू सरदारसह नऊ जणांना जन्मठेपनागपूर : या प्रकरणी मृत सूरजचा भाऊ राजेश अशोक यादव याच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३०२, ३०७, ३२३, ५०४, ५५२, ५०६-ब, २०१, हत्यार कायद्याच्या कलम ३, ४ / २५, मकोकाच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस आयुक्त अनंत थोरात यांनी या प्रकरणाचा तपास करून १७ मे २०१३ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाने ३८ साक्षीदार तपासले. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रशांतकुमार सत्यनाथन, सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी राजेश यादव यांच्यावतीने अ‍ॅड. बी. एम. करडे, अ‍ॅड. उज्ज्वल फसाटे, अ‍ॅड. भरत बोरीकर यांनी तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुरेंद्र सिंग, अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण, अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. आर. बी. गायकवाड, अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. अशोक भांगडे, अ‍ॅड. चेतन ठाकूर आणि अ‍ॅड. काझी यांनी काम पाहिले. शिक्षेवरील सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे यांनी युक्तिवाद करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. सहायक फौजदार सय्यद मुश्ताक, नायक पोलीस शिपाई अनिल दोनारकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)मकोकातून सर्वच निर्दोषया सर्व नऊ आरोपींची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गतच्या आरोपातून तसेच खुनाचा प्रयत्न गुन्हेगारी कट, धमकी, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आदी आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली.निर्दोष ठरलेले आरोपीमणिंदरजितसिंग ऊर्फ जेपी सरदार सोदी रा. अशोकनगर, अनुप ऊर्फ पिंटू फुलचंद चवरे रा. बेझनबाग, गौतम विठ्ठल पिल्लेवान रा. महाकालीनगर मानेवाडा, बंटी ऊर्फ आनंद रमेश नायर रा. मेकोसाबाग, आकाश रवींद्र बोस रा. मानेवाडा रोड, तिरुपती बाबूराव भोंगे रा. शांतीनगर आणि आशिष काल्या ऊर्फ महेंद्र रामटेके रा. इंदोरा, अशी निर्दोष सुटलेल्या आरोपींची नावे आहेत. खटला जिकरीने चालवलाबहुचर्चित ठरलेला सूरज यादव खून खटला आपण जिकरीने चालवला. मृत सूरजच्या आईने, भावाने आणि सर्वच पंच साक्षीदारांनी साक्ष देताना सरकार पक्षाची बाजू बळकट केली होती. मात्र मृताच्या पत्नीने आपली साक्ष उलटवली होती. आरोपींनी आपल्या पतीवर सशस्त्र हल्ला केल्याचे तिने न्यायालयात सांगितले होते. परंतु एकाही आरोपीला तिने न्यायालयात ओळखले नव्हते. त्यामुळे सरकार पक्षाने तिला ‘होस्टाईल’ घोषित केले होते. - प्रशांतकुमार सत्यनाथनविशेष सरकारी वकीलसर्वोच्च न्यायालयाचे १७ दाखले दिलेखटल्यातील सर्वच आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे १७ दाखले प्रत्यक्ष युक्तिवादाच्या दरम्यान न्यायालयात सादर केले होते. त्यापैकी अशोक बेबविरुद्ध त्रिपुरा राज्य २०१४ हा दाखल महत्त्वाचा ठरला.- बी. एम. करडे, फिर्यादीचे वकील