शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

बापरे... एकाच शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थी ‘कोरोना पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 10:21 IST

पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही शहरातील, तर काही ग्रामीण भागातील आहेत.

ठळक मुद्दे२४ तासात २६२ रुग्ण : सक्रिय रुग्णसंख्या १२२१

नागपूर : लहान मुलांमध्ये ‘व्हायरल’ वाढला असताना जयताळा येथील एका शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने काळजी वाढली आहे. यातच चार महिन्यांतील दैनंदिन रुग्णसंख्येने रविवारी उच्चांकही गाठला आहे. २६२ रुग्णांची नोंद झाली आहे. यात शहरातील १६२, तर ग्रामीण भागातील १०० रुग्ण आहेत. रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८१ हजार २५० झाली आहे. सुदैवाने मागील १५ दिवसांपासून मृत्यूची संख्या १० हजार ३३९ वर स्थिर आहे.

प्राप्त माहितीनुसार, जयताळा येथील रॉय स्कूल येथील १००वर विद्यार्थ्यांमध्ये ताप, सर्दी व घसा खवखवण्याची लक्षणे आढळून आली. या सर्वांची कोरोनाच चाचणी केली असता यातील ३८ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. यामुळे सोमवारी त्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचीही चाचणी केली जाणार आहे. याला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे. रविवार शाळा बंद असल्याने मुख्याध्यापकांशी संपर्क होऊ शकला नाही. पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही शहरातील, तर काही ग्रामीण भागातील आहेत.

-पॉझिटिव्हिटी दर १३ टक्के

नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत १ हजार ९६४ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर १३.३४ टक्क्यांवर गेला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा दुसऱ्या लाटेनंतर ज्या जिल्ह्यात १० टक्क्यांवर पॉझिटिव्हिटीचा दर होता, तेथील निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. समाधानाची बाब म्हणजे, आज शहरातील ८६, ग्रामीण भागातील ३२ असे ११८ रुग्ण बरे झालेत.

-१० दिवसांतच दुप्पट रुग्ण

जून महिन्यापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. प्रथम १०० रुग्णांचा टप्पा ओलांडण्यास ३६ दिवसांचा कालावधी लागला; परंतु आता १० दिवसांतच रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. यात लहान मुलांची संख्या वाढताना दिसून आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भरती होणाऱ्यांची संख्या २ टक्के

दिवसेंदिवस रुग्ण वाढत असले तरी रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या २ टक्केच आहे. सध्या कोरोनाचे १ हजार २२१ रुग्ण सक्रिय आहेत. यात शहरातील ८१८, ग्रामीण भागातील ४०३ रुग्ण आहेत. १ हजार १९३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर २८ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत भरती आहेत.

- सात दिवसांतील रुग्णांची स्थिती

११ जुलै : ६७ रुग्ण

१२ जुलै : १४६ रुग्ण

१३ जुलै : १९४ रुग्ण

१४ जुलै : १४० रुग्ण

१५ जुलै : १८८ रुग्ण

१६ जुलै : १७६ रुग्ण

१७ जुलै : २६१ रुग्ण.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर