दपूम रेल्वेच्या ३८ अधिकारी- कर्मचाऱ्यांना ‘जीएम अवॉर्ड’
By Admin | Updated: April 20, 2016 03:23 IST2016-04-20T03:23:33+5:302016-04-20T03:23:33+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ६१ व्या रेल्वे सप्ताहाचे आयोजन बिलासपूर मुख्यालयाच्या एन.ई. इन्स्टिट्यूट सभागृहात करण्यात आले.

दपूम रेल्वेच्या ३८ अधिकारी- कर्मचाऱ्यांना ‘जीएम अवॉर्ड’
कार्याचा गौरव : बिलासपूर मुख्यालयात समारंभ
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ६१ व्या रेल्वे सप्ताहाचे आयोजन बिलासपूर मुख्यालयाच्या एन.ई. इन्स्टिट्यूट सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार उपस्थित होते. समारंभात दपूम रेल्वेच्या नागपूर विभागातील ३८ रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाव्यवस्थापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समारंभात विभागातील विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी शिल्ड प्रदान केले. यात अभियांत्रिकी विभागाला सर्वोत्तम दक्षता शिल्ड, दहा उपविभागीय शिल्ड विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर मुख्यालयासह, बिलासपूर, रायपूर, नागपूर विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
समारंभात अभियांत्रिकी विभागाला सर्वोत्तम दक्षता शिल्ड, तुमसर रोड स्टेशनला सर्वोत्तम मायनर स्टेशन शिल्ड, भंडारा रोड स्थानकाला सर्वोत्तम मेजर स्टेशन शिल्ड, यांत्रिकी विभागाला सर्वोत्तम मिडियम डेपो गोंदिया डेमू शेड आणि कोचिंग डेपोसाठी, सामान्य विभागाला आय.टी. इम्प्लिमेन्टेशन शिल्ड, गोंदियाच्या सिग्नल आणि दूरसंचार विभागाला सर्वोत्तम सिग्नलिंग डेपो शिल्ड, तुमसर रोड स्टेशनच्या विद्युत विभागाला इलेक्ट्रिकल जनरल शिल्ड, गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाला सर्वोत्तम आरपीएफ पोस्ट शिल्ड, गोंदियाच्या वैद्यकीय विभागाला सर्वोत्तम हेल्थ युनिट सेंटर शिल्ड, गोंदियाच्या विद्युत व यांत्रिकी विभागाला सर्वोत्तम क्रू बुकिंग पॉर्इंट शिल्ड प्रदान करण्यात आले. ६१ व्या रेल्वे सप्ताहाचे आयोजन २१ एप्रिलला गुंजन सभागृहात करण्यात आले असून, यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल विभागातील अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र, रोख पुरस्कार देऊन सन्मानित करतील. (प्रतिनिधी)