शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ३७८ बॉटल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:57 IST

रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या तीन कारवायात दारूच्या १०९५० रुपये किमतीच्या ३७८ बॉटल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. होळीसाठी दारुबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात ही दारूची तस्करी होत होती.

ठळक मुद्देआरोपीला अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या तीन कारवायात दारूच्या १०९५० रुपये किमतीच्या ३७८ बॉटल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. होळीसाठी दारुबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात ही दारूची तस्करी होत होती.रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक संजय पुरकाम यांना बुधवारी रात्री ११.५० वाजता दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती निरीक्षक भगवान इप्पर यांना दिली. त्यांनी सहायक उपनिरीक्षक संजय पुरकाम, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांची चमू गठित केली. या चमूला प्लॅटफार्म क्रमांक २ वर रेल्वेगाडी क्रमांक १२५७७ बागमती एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ९० मिलिलिटरच्या ९३ बॉटल आढळल्या. याची किंमत २४०० रुपये आहे. दुसºया घटनेत रेल्वे सुरक्षा दलाच्या उषा तिग्गा, सुषमा ढोमणे यांना दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांनी उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, दिलीप कुमार, उषा तिग्गा, सुषमा ढोमणे, केदार सिंह, रजनलाल गुर्जर, बिक्रम यादव यांची चमू गठित केली. चमूला प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात एक बेवारस बॅग आढळली. बॅगची तपासणी केली असता त्यात ३३५० रुपये किमतीच्या दारूच्या ८५ बॉटल आढळल्या. तिसºया घटनेत गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आरपीएफचा प्रधान आरक्षक केदार सिंह, रजनलाल गुर्जर यांना दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, दिलीप कुमार, बिक्रम यादव यांच्यासह प्लॅटफार्म क्रमांक २ वर तपासणी केली. यावेळी वैभव सुरेश जवादे (१९), संग्राम घनशाम त्रिवेदी (१८) रा. शास्त्री वॉर्ड, पारी पोलच्या मागे, हिंगणघाट हेह संशयास्पद स्थितीत आढळले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात ५२०० रुपये किमतीच्या दारूच्या २०० बॉटल आढळल्या. तिन्ही घटनेत जप्त करण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर