शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगमुळे ‘रेल्वे’च्या तिजोरीत महिन्याला ३७.६९ लाखांची भर; रेल्वे स्थानक प्रशासनाची माहिती

By नरेश डोंगरे | Updated: May 6, 2024 00:30 IST

वाहन पार्किंगची नीट सोय झाल्याने प्रवासीही समाधानी

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे स्थानक परिसरात प्रशासनाने पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढताच प्रवाशांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीतही घसघशीत भर पडली आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांत मुख्य रेल्वे स्थानक परिसरात पार्किंगची समस्या खूपच जटिल झाली होती. स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना एकीकडे वाहन लावायला जागा उपलब्ध नव्हती तर दुसरीकडे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना टॅक्सी किंवा ऑटो वगळता दुसरे वाहन पाहिजे असेल तर बरेच दूर पायी जाऊन साधन मिळवावे लागत होते. रेल्वे स्थानकाजवळून बनविण्यात आलेल्या उड्डाणपुलाने ही समस्या आणखीच जटिल बनविली होती. त्यात गणेश टेकडी पूलही हटविण्यात आल्याने प्रवाशांच्या नाकी नऊ आले होते. पुरेशी जागा नसल्याने रेल्वे स्थानकासमोरच्या मार्गावर वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत होता. तर, वाहने लावण्यासाठी जागाच नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या नावाने प्रचंड ओरड होत होती. या पार्श्वभूमीवर येथील शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी उपलब्ध जागेतच योग्य ते नियोजन करून पार्किंगची व्यवस्था केल्याने एकीकडे प्रवाशांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. वारंवार होणारी ट्रॅफिक जामची समस्या निकाली निघाली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पार्किंगच्या व्यवस्थेतून रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत भर पडू लागली आहे. रेल्वे स्थानकावर देण्यात आलेल्या पार्किंगच्या कंत्राटातून एकट्या एप्रिल महिन्यात ३७ लाख, ६९ हजार रुपयांची प्रशासनाला कमाई झाली आहे.---------

महिनाभरात दुचाकीतून १०.०६ लाखघरोघरी, जागोजागी दुचाक्या दिसत असल्याने उपराजधानीला दुचाक्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पाहिजे त्या ठिकाणी लवकर पोहोचता यावे म्हणून अनेक जण दुचाकीवरच प्रवासाला प्राधान्य देतात. रेल्वे स्थानकावर रोज हजारो दुचाक्या बघायला मिळतात. त्यामुळे दुचाकी पार्किंगच्या कंत्राटातून मिळालेल्या १०.०६ लाखांच्या मोबदल्याचाही समावेश आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगrailwayरेल्वेnagpurनागपूर