शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

आयआयएम नागपूरच्या ‘ब्लेंडेड एम. बी. ए.’ साठी जगभरातून आले ३७३ अर्ज, ८३ उमेदवारांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 21:09 IST

‘ब्लेंडेड एमबीएच्या’ या पहिल्याच तुकडीसाठी केवळ भारतातूनच नव्हे तर इतर अनेक देशांमधून तब्बल ३७३ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ८३ विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे.

- आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) नागपूरतर्फे व्यवसाय किंवा नोकरी करीत असलेल्या अनुभवी लोकांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण अश्या ‘ब्लेंडेड एमबीए’ अभ्यासक्रमाची सुरुवात शनिवारी करण्यात आली. ‘ब्लेंडेड एमबीएच्या’ या पहिल्याच तुकडीसाठी केवळ भारतातूनच नव्हे तर इतर अनेक देशांमधून तब्बल ३७३ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ८३ विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे. यात भारताच्या २० हून अधिक राज्यांतून आलेल्या तसेच परदेशातील काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. 

या अभ्यासक्रमाचे औपचारिक उद्घाटन शनिवारी केले गेले. आय. आय. एम. नागपूरचे संचालक प्रा. भिमराया मेत्री यावेळी अध्यक्षस्थानी होते. मुख्य अतिथी म्हणून केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. मुथुकुमार तर विशेष अतिथि म्हणून मॅकॅफी सॉफ्टवेअर प्रा. लि. चे चॅनेल मार्केटिंग (इंडिया अँड मिडल ईस्ट) प्रमुख निलभ नाग उपस्थित होते. आय. आय. एम नागपूर चे प्रा. देबारुण चक्रवर्ती हे या अभ्यासक्रमाचे कार्यक्रम संयोजक आहेत. 

या पहिल्या बॅचसाठी परदेशी इच्छुकांसह एकूण ३७३ अर्ज प्राप्त झाले. यापैकी २३२ उमेदवारांची लेखी चाचणी आणि त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या. यातून ८३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या गटामध्ये ६४ पुरुष आणि १९ महिला सहभागी असून पहिल्या तुकडीचे सरासरी वय ३१ वर्षे आणि सरासरी कार्यानुभव ७ वर्षे आहे. 

 माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, रुग्णालय उपकरणे, शिक्षण आणि प्रशिक्षण, तेल आणि नैसर्गिक वायु, वीज निर्मिती आणि वितरण, कन्सल्टिंग, निर्मिती, विक्री, लॉजिस्टिक्स, डिफेन्स, फार्मा, केमिकल, शेती, अन्न निर्मिती आणि प्रक्रिया, ओ. ई. एम. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचा समावेश आहे. टाटा, कॉगनिझन्ट हिंदुस्थान पेट्रोलियम, लॉयडस, आणि इतर प्रतिष्ठित संस्थांतील कर्मचारी या अभ्यासक्रमात प्रविष्ट झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : IIM Nagpur's Blended MBA Attracts Global Interest; 83 Students Selected

Web Summary : IIM Nagpur's Blended MBA program, aimed at working professionals, commenced with 83 students selected from 373 global applications. The diverse batch represents over 20 Indian states and international locations, featuring professionals from various sectors like IT, healthcare, and manufacturing, with an average age of 31 and seven years of experience.