मास्क न लावणाऱ्या ३७२७२ लोकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:09 IST2021-04-09T04:09:33+5:302021-04-09T04:09:33+5:30

लोकमत न्यूज् नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी मास्क न वापरणाऱ्या ५२ नागरिकांकडून ...

37272 people fined for not wearing mask | मास्क न लावणाऱ्या ३७२७२ लोकांना दंड

मास्क न लावणाऱ्या ३७२७२ लोकांना दंड

लोकमत न्यूज् नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी मास्क न वापरणाऱ्या ५२ नागरिकांकडून २६ हजार दंड वसूल केला. या सर्वाना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३७२७२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन १ कोटी ६९ लाख ,९५ हजाराचा दंड वसूल केला आहे.

गुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २१, धरमपेठ ३, धंतोली झोन २, नेहरुनगर झोन ४, गांधीबाग झोन २, लकडगंज झोन अंतर्गत ४, आशीनगर झोन अंतर्गत ६, मंगळवारी झोन अंतर्गत १० जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: 37272 people fined for not wearing mask