शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

नागपूर जिल्हा परिषदेचा ३७ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:52 IST

जि.प.चे वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ३७ कोटी ५३ लाख ५ हजार ४७ रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ आकडेवारीची फुगवाफुगव असल्याचा आरोप करीत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तर सर्वच विभागाला न्याय दिल्याचा दाखला देत वास्तववादी अर्थसंकल्प मांडल्याचे सत्ताधाऱ्यांनी दावा केला.

ठळक मुद्देविरोधकांची नाराजी : सत्तापक्ष म्हणतो, वास्तववादी अर्थसंकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जि.प.चे वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ३७ कोटी ५३ लाख ५ हजार ४७ रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ आकडेवारीची फुगवाफुगव असल्याचा आरोप करीत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तर सर्वच विभागाला न्याय दिल्याचा दाखला देत वास्तववादी अर्थसंकल्प मांडल्याचे सत्ताधाऱ्यांनी दावा केला.अर्थसंकल्पीय सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष शरद डोणेकर, अर्थ समितीचे सभापती उकेश चव्हाण, समाजकल्याण समितीचे सभापती दीपक गेडाम, कृषी सभापती आशा गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती वाघाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, प्रमिला जाखलेकर आदी उपस्थित होते. अर्थसंकल्प सादर करताना चव्हाण म्हणाले, मागील तीन वर्षात जि.प.च्या उत्पन्नातून १०० कोटींच्यावर विकास योजना राबविण्यात आल्या. जि.प.ने आर्थिक, शैक्षणिक व संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी समर्थपणे पेलली. चालू वित्तीय वर्षातील प्रथम १० महिन्याचे प्रत्यक्ष उत्पन्न व पुढील दोन महिन्याचे अपेक्षित उत्पन्न विचारात घेऊन २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पापूर्वी जिल्ह्यातील दोन आत्महत्या केलेल्या शेतकºयांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या आई सुधा मोहरकर यांचा सन्मान करण्यात आला. कोणत्या विभागात किती तरतूदविभाग                                             तरतूदसामान्य प्रशासन          २ कोटी ६२ लाख ७९ हजार ५००शिक्षण                        ३ कोटी ९७ लाख ३ हजारबांधकाम                     ६ कोटी २७ लाख २ हजारलघु पाटबंधारे              १ कोटीआरोग्य अभियांत्रिकी   ४ कोटीआरोग्य                      १ कोटीकृषी                          २ कोटी १६ लाख ५ हजारपशुसंवर्धन               १ कोटी २५ लाख ४०० रुपयेसमाजकल्याण         ४ कोटीअपंग कल्याण         ६० लाखसामूहिक विकास       ६ कोटी ८० लाखपंचायत                     ३० लाखसमाजकल्याण (वने)    ३१ लाख ८० हजारमहिला,बालकल्याण        २ कोटी असा येणार रुपयाआरोग्य ०.३, व्याज २६.४, संकीर्ण ४.२, सिंचन १.४, बांधकाम ६.७, कृषी १.४, शिक्षण ०.४, जंगल अनुदान ०.९, अभिकरण शुल्क ४ टक्के २.८, स्थानिक उपकर सापेक्ष अनुदान ५.०, जमीन महसूल अनुदान ०.४, पाणीपट्टी शासकीय ७.१, मुद्रांक शुल्क ३६.६, सामान्य कर १.४, वाढीव उपकर ३.३, कर व फी १.७.असा जाणार रुपयाघसारा निधी (वित्त विभाग) ०.८, ग्रामपंचायत विभाग ०.८, महिला व बालकल्याण विभाग ५.३, सामूहिक विकास १८.१, अपंग कल्याण १.६, समाजकल्याण १०.७, वने ०.८, पशुसंवर्धन ३.३, कृषी ५.८, आरोग्य अभियांत्रिकी १०.७, सार्वजनिक आरोग्य २.७, लघु पाटबंधारे २.७, इमारती व बांधकाम १६.७, शिक्षण १०.६, सामान्य प्रशासन ७ आणि मानधन व प्रवासभत्ता २.४ नावापुरताच अर्थसंकल्प२० कोटींची मिळकत असताना ३७ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तरीही यात २०१७-१८ च्या अखर्चित निधीचाही उल्लेख नाही. ५३ टक्के राखीव निधीतून किती निधी खर्च झाला, याची आकडेवारी सत्ताधाऱ्यांकडे नाही. नावीन्यपूर्ण असे काहीच नाही. जुन्या बाटलीत नवी दारू, असाच प्रकार अर्थसंकल्पाच्या बाबतीत झाला आहे.चंद्रशेखर चिखले, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस बजेट निव्वळ औपचारिकताडीबीटीमुळे जिल्हा परिषदेच्या संपूर्ण योजना रखडल्या आहेत. सर्वसामान्य गावकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून शासनाने त्यांना वंचित केले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात कृषी विभागाला एकही लाभार्थी मिळालेला नाही. मिनी मंत्रालय म्हणणारी जिल्हा परिषद सामान्यांच्या तोंडाला पाने पुसत असेल, आकड्यांचा खेळ करून बजेट मांडत असेल तर ही निव्वळ औपचारिकता आहे. डीबीटीच्या विरोधात साधा ठरावसुद्धा घेण्यास पदाधिकारी घाबरत असेल तर पदाधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते वास्तववादी अर्थसंकल्पअर्थसंकल्प चांगला आहे. कुठलीही आकडेवारी फुगवून सांगितली नाही. अखर्चित निधीचा अर्थसंकल्पात समावेश केला नाही. अखर्चित निधीचे पुनर्नियोजन करून त्या त्या विभागाला निधी वाटप करण्यात येईल. काही नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश करून हा वास्तववादी अर्थसंकल्प आहे.उकेश चव्हाण, वित्त सभापतीसर्वच विभागाला न्याय दिलाअर्थसंकल्पातून सर्वच विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ अर्थसंकल्प ३७.५० कोटी रुपयांचा आहे. पुढे त्यात अखर्चित जोडले जाणार असल्याने जि.प.कडे यंदा जनतेच्या कल्याणाकरिता अधिक निधी हाती असेल.निशा सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरBudgetअर्थसंकल्प