३६८ पॉझिटिव्ह, ८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST2020-12-31T04:09:25+5:302020-12-31T04:09:25+5:30

नाागपूर : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ३६८ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले व ८ जणांचा मृत्यू झााला. तर ३६६ रुग्ण ...

368 positive, 8 killed | ३६८ पॉझिटिव्ह, ८ जणांचा मृत्यू

३६८ पॉझिटिव्ह, ८ जणांचा मृत्यू

नाागपूर : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ३६८ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले व ८ जणांचा मृत्यू झााला. तर ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील ७६ व शहरातील २९० रुग्णांचा समावेश आहे तर मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीण भागातील १ व जिल्ह्याबाहेरच्या दोघांचा समावेश आहे.

नागपुरात आतापर्यंत ९,२५,२१६ नमुने तपासण्यात आले. यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,२३,३७४ वर पोहोचली आहे. यापैकी १,१५,७२० रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. तर ३९२२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३७३२ ॲक्टीव्ह आहेत. यात ग्रामीण भागातील १०७१ तर शहरातील २६६१ रुग्ण आहेत. बुधवारी एकूण ५००७ नमुने तपासण्यात आले. यात ४१७८ आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली तर ८२९ जणांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८० टक्के इतके आहे.

ॲक्टीव्ह रुग्ण - ३७३२

एकूण बरे झालेले - १,१५,७२०

एकूण मृत्यू -३९२२

Web Title: 368 positive, 8 killed