शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

मनपा तिजोरीत दंडातून ३.६८ कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 23:35 IST

3.68 crore collected from fines कोरोना संकटामुळे मनपाच्या उत्पन्नाला जबर फटका बसला आहे. मात्र या कालावधीत निर्बंध असूनही बेकायदेशीरीत्या लग्नसोहळे, कार्यक्रम करणारे, छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवून विक्री करणारे आणि मास्कशिवाय वावरणाऱ्या ४७ हजारांहून अधिक लोकांकडून महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मागील ११ महिन्यात तब्बल ३ कोटी ६८ लाख ३६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देनियमाचे उल्लंघन; बेकायदेशीर लग्नसोहळे, विनामास्क व दुकाने सुरू ठेवणे भाेवले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संकटामुळे मनपाच्या उत्पन्नाला जबर फटका बसला आहे. मात्र या कालावधीत निर्बंध असूनही बेकायदेशीरीत्या लग्नसोहळे, कार्यक्रम करणारे, छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवून विक्री करणारे आणि मास्कशिवाय वावरणाऱ्या ४७ हजारांहून अधिक लोकांकडून महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मागील ११ महिन्यात तब्बल ३ कोटी ६८ लाख ३६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. मनपा प्रशासनाने ५ जून २०२० पासून कारवाईला सुरूवात केली. इतका दंड वसूल केल्यानंतरही शहरात नियम मोडणाऱ्यांची संख्या कायम असल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन दरम्यान विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. सुरूवातीला विनामास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारला जात होता. यातून ५ जून ते १५ सप्टेंबर २०२० दरम्यान ११ हजार ६४ लोकांकडून २२ लाख १२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दंडानंतही विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने १६ सप्टेंबर २०२० पासून ५०० रुपये दंड करण्यात आला. १९ मे पर्यंत ३२ हजार ५८० नागरिकांकडून १ कोटी ६२ लाख ९० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे १ कोटी ८५लाख २ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला.

लॉकडाऊन कालावधीत शहरात निर्बंधाची अंमलबजावणी करताना ६ जून २०२० पासून ऑड इव्हन कारवाई करण्यात आली. ६ जून ते २१ जुलै २०२० दरम्यान नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १३८० दुकानदारांकडून १३ लाख ८० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर १७ जुलै २०२० पासून दंडाच्या रकमेत ५ ते १० हजारापर्यंत वाढ करण्यात आली. यात १८ जुलै ते २२ सप्टेंबर २०२० दरम्यान ५ हजाराप्रमाणे ९७९ दुकानदारांकडून ४८ लाख ९३ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला तर ८ हजार रूपये प्रमाणे १२ दुकानदारांकडून ९६ हजार, १० हजार रुपये प्रमाणे ७३ दुकानदारांकडून ७ लाख २० हजार दंड वसूल करण्यात आला.

मंंगल कार्यालये, लॉन, दुकानदार आदींनी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी १३१८ प्रकरणात १ कोटी ७ लाख ९५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त राधकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार एनडीएस पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

कोविड नियमाचे उल्लंघन : कारवाई व वसूल दंड

विना मास्क कारवाई - १७३८४५००

ऑड इव्हन दुकाने कारवाई १ हजार प्रमाणे -१३८०००

ऑड इव्हन दुकाने कारवाई ५ हजार प्रमाणे -४ ८९ ५००

ऑड ईवन दुकाने कारवाई ८ हजार प्रमाणे -९६०००

ऑड इव्हन दुकाने कारवाई १० हजार प्रमाणे -७, ३००००

दुकानदार, मंगलकार्यालय, लॉन व अन्य -१,० ७९५०००

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या