आरपीएफची कारवाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविल्या
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने दानापूर एक्स्प्रेसमधून दुपारी १२.१० वाजता दारूच्या ३१ हजार ८०० रुपये किमतीच्या ३६६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाच्या अँटी हॉकर्स आणि क्राईम डिटेक्शन टीमचे उपनिरीक्षक सचिन दलाल, महिला पोलीस उषा तिग्गा, भारत माने, श्याम झाडोकार, जितेंद्र कुमार, गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक आर. के. यादव, दिलीप पाटील, सागर लाखे, आनंद जमदाडे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक केशव चौधरी हे प्लॅटफाॅर्म क्रंमांक २ वर गस्त घालत होते. यावेळी दुपारी १२.१० वाजता प्लॅटफाॅर्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक ०२७९२ दानापूर एक्स्प्रेसच्या एस-५ कोचमध्ये दोन बेवारस पोती आढळले. या पोत्यांबाबत आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता त्यावर कोणीच आपला हक्क सांगितला नाही. हे पोते आरपीएफ ठाण्यात आणून पंचासमक्ष उघडले असता त्यात ३१ हजार ८०० रुपये किमतीच्या दारुच्या ३६६ बॉटल आढळल्या. आरपीएफचे निरीक्षक जुबेर पठाण यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
..........