अभियांत्रिकीच्या ३६ टक्के जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST2021-02-20T04:19:45+5:302021-02-20T04:19:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विभागातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, वर्गदेखील सुरू झाले आहेत. महाविद्यालयांमधील ३६ ...

अभियांत्रिकीच्या ३६ टक्के जागा रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, वर्गदेखील सुरू झाले आहेत. महाविद्यालयांमधील ३६ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. तर ‘पॉलिटेक्निक’मधील रिक्त जागांची टक्केवारी ४३ टक्के इतकी आहे.
राज्य सीईटी सेलतर्फे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी आणि एमसीए कॉलेजेसमधील प्रवेशांची प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली. याअंतर्गत विविध शासकीय व खासगी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. नागपूर विभागात अभियांत्रिकीच्या एकूण १७ हजार २८९ जागा आहेत. त्यापैकी ११ हजार ४१ जागांवर प्रवेश झाले व ६ हजार २४८ जागा रिक्त राहिल्या.
दुसरीकडे ‘पॉलिटेक्निक’ची प्रवेशक्षमता १३ हजार ४९२ इतकी आहे. त्यापैकी ५ हजार ९१९ जागांवर प्रवेश झाले व ही टक्केवारी ५७ टक्के इतकी राहिली. खासगी महाविद्यालयातील जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. बीफार्म व एमसीएमध्ये मात्र चांगले प्रवेश झाले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमात अनुक्रमे ९३.५४ व ९२.५९ टक्के प्रवेश झाले.
नागपूर विभागातील प्रवेश
अभ्यासक्रम-प्रवेश क्षमता- रिक्त जागा
बीई -१७,२८९ -६,२४८
बी.फार्म. -१,९८५ - १२८
एमसीए - ६३४ - ४७
पॉलिटेक्निक-१३,४९२ -५,९१९