३५ तरुणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST2021-04-16T04:07:50+5:302021-04-16T04:07:50+5:30
वाडी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाडी नजीकच्या पिपळा (घाेगली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले ...

३५ तरुणांनी केले रक्तदान
वाडी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाडी नजीकच्या पिपळा (घाेगली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ३५ स्थानिक तरुणांनी रक्तदान केले.
सरपंच नरेश भोयर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून शिबिराचे उद्घाटन केले. काेराेना संक्रमण काळात रक्ताचा तुटवडा जावणत असल्याने या रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती सरपंच नरेश भाेयर यांनी दिली. नागपूर येथील साईनाथ ब्लड बँकेच्या चमूने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच प्रभू भेंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भोयर, सुनील राहाटे, वनिता कावळे, शकून वाघ, मनोहर सपकाळ, श्रीधर गाडगे, करण खंडाळे, शान आकांत, अंकुश धाडसे, दिलीप लेंढे, राजेश सोनटक्के, अनिल ढोणे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी सुरेश बागडे, गिरीश राऊत, निखिल भोयर, मुकेश इंगळे, प्रकाश भोयर, नरेश बागडे, पिंटू यादव आदींनी सहकार्य केले.