३.५ टक्के..! छे, १३.३९ टक्क्यांनी वाढला वीज दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:08 AM2020-10-15T11:08:00+5:302020-10-15T11:10:03+5:30

electricity tariff Nagpur News या वर्षी फक्त ३.५ टक्के वाढ झाल्याचे राज्य सरकार आणि प्रदेश विद्युत नियामक आयोग सांगत आहे. असे असले तरी, ग्राहकांच्या बिलांचे अध्ययन केल्यावर ही वाढ ३.५ टक्के नव्हे तर १३.३९ टक्सके झाल्याचे दिसत आहे.

3.5 percent ..! Yes, electricity tariff increased by 13.39 per cent! | ३.५ टक्के..! छे, १३.३९ टक्क्यांनी वाढला वीज दर !

३.५ टक्के..! छे, १३.३९ टक्क्यांनी वाढला वीज दर !

Next
ठळक मुद्देदेयक पाहून ग्राहकांचे गरगरतात डोळेहा फिक्स्ड चार्जचा परिणामहजार युनिटपेक्षा अधिकचे दर कमी करून आकड्यात गुंतागुंत

कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनलॉकच्या काळात आता मासिक बील नियमित यायला लागले आहेत. मात्र राज्यामधील विजेच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या वर्षी फक्त ३.५ टक्के वाढ झाल्याचे राज्य सरकार आणि प्रदेश विद्युत नियामक आयोग सांगत आहे. असे असले तरी, ग्राहकांच्या बिलांचे अध्ययन केल्यावर ही वाढ ३.५ टक्के नव्हे तर १३.३९ टक्सके झाल्याचे दिसत आहे.

राज्यात विजेची दरवाढ लॉकडाऊनच्या कायात १ एप्रिलपासून लागू झाली आहे. तेव्हा रीडिंग आणि बिल वितरण बंद होते. जून-जुलै महिन्यात तीन ते चार महिन्यांचे एकदम बिल आले. आॅक्टोबरपर्यंत परिस्थिती सामान्य होऊन आता एक महिन्याचे बिल यायला लागले आहे. घरगुती ग्राहकांना २१० युनिटसाठी १,८४० रुपयांचे बिल येत आहे.नव्या दरांची घोषणा करताना ० ते १०० युनिटपर्यंच्या उपयोगासाठी दर घटविल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात दर ४.३३ रुपये प्रति युनिटवरून ४.९१ रुपये झाले आहेत. थेट ३३.३९ टक्क्यांनी ही वाढ आहे. ०१ ते ३०० पर्यंतच्या युनिट वापरासाठी ८.८८ रुपये प्रति युनिट दर ठेवण्यात आला आहे. यात प्रति युनिटचा दर ४.९१ रूपयांवरून वाढून ८.८८ रुपये झाला आहे. या श्रेणींमधील दरांमध्ये असणाऱ्या तफावतीमुळे विजेची बिले वाढली आहेत. सर्वाधिक ग्रहक या दोन श्रेणीतच येतात. यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडत आहे.

यात भरीस भर म्हणजे, फिक्स्ड चार्ज ९० रुपयांवरून १०० रुपए झाला आहे. कागदोपत्री दर वृद्धी घटविल्याचे दाखविण्यासाठी अधिक श्रेणीतील वीज दरात वाढ करण्यात आलेली नाही. ३०५ ते ५०० युनिटसाठी ५.२८ टक्के आणि ५०१ ते १००० करिता २.९७ कटक्के वाढ करण्यात आली आहे. १००१ पेक्षा अधिक उपयोगाच्या युनिटसाठी ४.५० टक्के दर घटविला आहे. या श्रेणीत फारच कमी ग्राहक येतात. नेमक ी घट दाखवून दरवाढ घटविल्याचा दावा केला जात आहे.

 

Web Title: 3.5 percent ..! Yes, electricity tariff increased by 13.39 per cent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज