तीन ग्रामपंचायतीसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:12 IST2020-12-30T04:12:52+5:302020-12-30T04:12:52+5:30
कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यात होऊ घातलेल्या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बाकी आहे. मंगळवारपर्यंत तीन ग्रामपंचायतीसाठी एकूण ...

तीन ग्रामपंचायतीसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल
कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यात होऊ घातलेल्या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बाकी आहे. मंगळवारपर्यंत तीन ग्रामपंचायतीसाठी एकूण ३५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. पाच ग्रामपंचायतीचे १६ वाॅर्डात विभाजन करण्यात आले असून एकूण ४७ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. मंगळवारी कोहळी ग्रामपंचायतसाठी १०, सावंगी (तोमर) ग्रामपंचायतसाठी १८ तर सेलू ग्रामपंचायतसाठी ७ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहे. उर्वरित सोनपूर (आदासा) व सोनेगाव (पोही) ग्रामपंचायत साठी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता लोकप्रतिनिधी प्रयत्नरत असून गावानेत्यांची समजूत काढताना दिसत आहेत. तालुक्यात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असला तरी गावस्तरावर या पक्षाचेही गटागटात विभाजन झाले आहे. यामुळे एकाच पक्षाचे कार्यकर्ते असले तरी आमचेच राजकीय वर्चस्व गावात कसे अबाधित राहील या कारणाने उमेदवारी ठरविण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. गावातील ग्रामपंचायतीची राजकीय लढत उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.