आरोग्य शिबिराचा ३,४३३ जणांनी लाभ घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:13 IST2017-08-22T00:12:46+5:302017-08-22T00:13:10+5:30
महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या प्रभाग १६ च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिर व समाधान शिबिरात पाच हजार नागरिकांनी लाभ घेतला.

आरोग्य शिबिराचा ३,४३३ जणांनी लाभ घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या प्रभाग १६ च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिर व समाधान शिबिरात पाच हजार नागरिकांनी लाभ घेतला.
आरोग्य शिबिरात ८०० रुग्णांची नेत्र तपासणी, ४०० रुग्णांना मोफत चष्मे, १५० रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया, ३२ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, ४२२ जणांची मोफत बोन डेन्सिटी तपासणी, २८२ जणांची दंत तपासणी, २५० बालकांची व ३८० महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
अशाप्रकारे ३,४३३ जणांची आरोग्य तपासणी करून आवश्यक रुग्णांना औषध वाटप करण्यात आले; यासोबतच समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात रेशनकार्ड, पॅनकार्ड, स्मार्टकार्ड, ज्येष्ठ नागरिकांना कार्ड, सिटी सर्वे नोंदणीची कामे करण्यात आली. अशा विविध सुविधांचा १५०० लोकांनी लाभ घेतला. याप्रसंगी १३ गरीब विद्यार्थ्यांना मनोज परसवानी यांच्या सहकार्याने सायकल वाटप करण्यात आले. माई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष उषा निशितकर यांच्याद्वारे संदीप जोशी यांच्या हस्ते ५० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक र्त्यांचा जन्मदिवस हा उपक्रमांनीच साजरा व्हावा, असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी याप्रसंगी केले. प्रारंभी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, राजीव हडप, जयप्रकाश गुप्ता, सभापती अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर, दिलीप दिवे, बंटी कुकडे, प्रमोद चिखले यांच्यासह आशिष पाठक, सचिन काळकर, श्रीपाद बोरीकर, सुरेंद्र पांडे, किशोर वानखेडे, पल्लवी शामकुळे यांच्यासह प्रभागातील पक्षाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.