सहा महिन्यात ३४ वाघांचा मृत्यू
By Admin | Updated: July 7, 2015 02:18 IST2015-07-07T02:18:08+5:302015-07-07T02:18:08+5:30
एकीकडे केंद्र व राज्य सरकार देशभरातील वाघांचे संरक्षण व संवर्धनासाठी धडपड करीत आहे ..

सहा महिन्यात ३४ वाघांचा मृत्यू
संजय रानडे नागपूर
एकीकडे केंद्र व राज्य सरकार देशभरातील वाघांचे संरक्षण व संवर्धनासाठी धडपड करीत आहे तर दुसरीकडे जानेवारी २०१५ पासून गत सहा महिन्यात देशभरात विविध करणांमुळे एकूण ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक कर्नाटकमध्ये नऊ वाघांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून येथे सहा वाघांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र व तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. येथे ५-५ वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पाचपैकी एका वाघाचा जळगाव जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. तसेच २३ एप्रिल ते २९ जूनदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात चार वाघांचा मृत्यू झाला आहे.
वन विभागाला धक्का
सहा महिन्यातनागपूर : एवढ्या कमी कालावधीत पाच वाघांच्या मृत्यूने वन विभागाला फार मोठा धक्का बसला आहे. राज्यात २०१४ मध्ये याच काळात वाघाचे कातडे व इतर अवयवांच्या तस्करीच्या दोन घटना पुढे आल्या होत्या. यावर्षी वाघाच्या मृत्यूची पहिली घटना १ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील दौलाखेडा येथील कम्पार्टमेंट क्र. ५७२ मध्ये उघडकीस आली. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा डिव्हिजनमध्ये २३ एप्रिल रोजी जुनोना रेंजमधील कम्पार्टमेंट क्र. ४७६ मध्ये एका वाघाच्या मृत्यूची घटना पुढे आली.
तसेच दुसरी घटना ब्रम्हपुरी डिव्हिजनमधील तळोधी रेंजमध्ये, तिसरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर एरियात व चौथी घटना सिंदेवाही रेंजमधील काघाटा येथील कम्पार्टमेंट क्र. १६८ मध्ये पुढे आली. (प्रतिनिधी) ३४ वाघांचा मृत्यू