राज्यात स्वाईन फ्लूचे ३३४ बळी
By Admin | Updated: March 21, 2015 02:47 IST2015-03-21T02:47:22+5:302015-03-21T02:47:22+5:30
राज्यात स्वाईन फ्लूने आतापर्यंत ३३४ रुग्णांचे बळी घेतले आहे तर ३ हजार २०७ रुग्णांना याची लागण झाली आहे. यात सर्वात जास्त मृत्यू पुणे आरोग्य सेवा मंडळात झाले आहे.

राज्यात स्वाईन फ्लूचे ३३४ बळी
नागपूर : राज्यात स्वाईन फ्लूने आतापर्यंत ३३४ रुग्णांचे बळी घेतले आहे तर ३ हजार २०७ रुग्णांना याची लागण झाली आहे. यात सर्वात जास्त मृत्यू पुणे आरोग्य सेवा मंडळात झाले आहे. मृत्यूचा हा आकडा ११५ वर गेला आहे. या खालोखाल नागपूर आरोग्य सेवा मंडळाचा क्रमांक असून ९४ रुग्णांचा मृत्यू तर ५०९ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.
वाढलेले तापमान आणि जनजागृतीमुळे राज्यात स्वाईन फ्लूच्या रु ग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत कमी झाली आहे. आरोग्य सेवा मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, सर्वात कमी रुग्ण ठाणे आरोग्य सेवा मंडळात आढळून आले आहे. या मंडळांतर्गत आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ७७ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळांतर्गत १२ रुग्णांचा मृत्यू तर ३८ रुग्ण पॉझिटीव्ह, नाशिक आरोग्य सेवा मंडळांतर्गत २० रुग्णांचा मृत्यू तर १३५ रुग्ण पॉझिटीव्ह, औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळांतर्गत २३ रुग्णांचा मृत्यू तर ६२ रुग्ण पॉझिटीव्ह, लातूर आरोग्य सेवा मंडळात २२ रुग्णांचा मृत्यू तर ७२ रुग्ण पॉझिटीव्ह आणि अकोला आरोग्य सेवा मंडळात ९ रुग्णांचा मृत्यू तर ६० रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. पूणे आरोग्य सेवा मंडळात आतापर्यंत ८८३ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. (प्रतिनिधी)