शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चक्क हातोड्यात लपवून आणले 33 तोळे सोनं, नागपूर विमानतळावर तीन तरुणांना अटक

By योगेश पांडे | Updated: September 7, 2022 21:12 IST

नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईतून चक्क हातोड्यातून सोन्याची तस्करी झाल्याची घटना समोर आली आहे.

नागपूर :नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईतून चक्क हातोड्यातून सोन्याची तस्करी झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर विमानतळावरून तीन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळील लोखंडी हातोड्याच्या आत ३३७ ग्रॅम सोने आढळले. हे तिघेही आरोपी नागौरचे रहिवासी आहेत. दोन दिवसांअगोदर गणेशपेठेत दुबईहून आलेले आयफोन्स, ॲपल वॉच लुटण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याचाच तपास करत असताना गणेशपेठ पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले.

पाच सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातील मोहम्मद अली ऊर्फ जहांगीर खान उमर (३४) यांना दुबई येथील मित्र मोहम्मद ऊर्फ मोती खान याचा फोन आला. त्याने पाठविलेल्या सामानाची बॅग एका व्यक्तीकडून विमानतळाहून घेतली. त्यात सहा लाख किमतीचे आयफोन, ॲपल वॉच, रोलॅक्स वॉच आदी सामान होते. उमरला सकाळी सहा वाजता कारमधून आलेल्या दोघांनी लुटले. यासंदर्भात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गणेशपेठ पोलिसांचे पथक विमातळावर पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना तीन जणांचा संशय आला. त्यांचा चौकशीसाठी ताब्यात घेतले असता बॅगेत दोन हातोडे, स्टेपलरच्या पिन्स आणि ब्लँकेट सापडले. ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांच्या जवळील दुबईला मजुरीसाठी जाण्यास सांगितले. हातोडा, सुटे भाग यांची माहिती त्यांना देता आली नाही. पोलिसांनी सराफा व्यापाऱ्याकडे हातोडा तपासासाठी पाठवला. हातोडा लोखंडाचा असला तरी दुबईहून केवळ दोन हातोडे आणि सुटे भाग पाठवल्याची बाब पोलिसांना पचनी पडली नाही. हातोडा फोडला तेव्हा त्यात लपविलेले सोने बाहेर आले. यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.

अक्रम मलिक दिन मोहम्मद (३२, नागौर, राजस्थान), इर्शाद इसाक खान (२१, नागौर, राजस्थान) आणि राहुल हरिश्चंद्र यादव (२४, आझमगड, यूपी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी दुबईमध्ये कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करांच्या सांगण्यावरून 'कुरिअर मेन' म्हणून काम करत होते. पाच सप्टेंबर रोजी जहांगीर खान उमरला नेमके कुणी लुटले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याच्याकडे दुबईहून आलेले सामान असल्याची टीप या तिघांनीच दिल्याचा पोलिसांना संशय आहे.

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंnagpurनागपूर