३३ एसीएफ झाले डीएफओ
By Admin | Updated: April 8, 2016 03:02 IST2016-04-08T03:02:23+5:302016-04-08T03:02:23+5:30
राज्य शासनाने वन विभागातील ३३ सहायक वनसंरक्षक, गट-अ (कनिष्ठ श्रेणी) अधिकाऱ्यांना विभागीय वन अधिकारी म्हणून पदोन्नती देऊन त्यांच्या नवीन पदस्थापनेचा आदेश जारी केला आहे.

३३ एसीएफ झाले डीएफओ
काळे यांची प्राणिसंग्रहालय प्राधिकरणावर वर्णी
नागपूर : राज्य शासनाने वन विभागातील ३३ सहायक वनसंरक्षक, गट-अ (कनिष्ठ श्रेणी) अधिकाऱ्यांना विभागीय वन अधिकारी म्हणून पदोन्नती देऊन त्यांच्या नवीन पदस्थापनेचा आदेश जारी केला आहे. विशेष म्हणजे, यात नागपुरातील १२ वन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मागील २३ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) यांनी राज्य शासनाकडे या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाने हे पदोन्नती आदेश जारी केले आहेत.
पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नागपुरातील नंदकिशोर व्यंकटेश काळे यांना महाराष्ट्र प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नागपूर येथे विभागीय वन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नागपूर येथील ही पहिलीच नियुक्ती आहे. तसेच उत्तम सावंत यांची नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथे उपसंचालक म्हणून, संतोष सस्ते यांची सामाजिक वनीकरण-वर्धा येथे उपसंचालकपदी , सचिन रेपाळ यांची गोरेवाडा प्रकल्प, येथे विभागीय व्यवस्थापक म्हणून, विजय खेडकर यांची विभागीय वन अधिकारी (मूल्यांकन), चंद्रपूर, नीता ढेरे यांची विभागीय वन अधिकारी (रोहयो), नागपूर, मनीषा पाटील यांची विभागीय वन अधिकारी (तेंदू) येथे, योगेश वाघाये यांची विभागीय वन अधिकारी (योजना) चंदपूर येथे, दीपक खाडे यांची ताडोबा-अंधारी येथे, प्रशांत खाडे यांची विभागीय वन अधिकारी (तेंदू) गडचिरोली येथे, पी. ए. डोंगरे यांची विभागीय वन अधिकारी (वनसंपत्ती संवर्धन),गडचिरोली येथे व एस.एफ. पावरा यांची विभागीय वन अधिकारी (तेंदू), नागपूर येथे पदस्थापना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)