शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमधील ३२२ कुटुंबांना सानुग्रह अनुदान मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:29 IST

मिहान प्रकल्पात गेलेल्या खापरी रेल्वे गावातील आणि गावठाणातील जमिनीचे भूसंपादन झाले आहे. पण गावठाणाशेजारी असलेल्या ३२२ कुटुंबांचे मात्र अजूनही भूसंपादन झालेले नाही.

ठळक मुद्देप्रस्ताव तयार करण्यासंदर्भात माजी पालकमंत्र्यांची भूसंपादन अधिकाऱ्यांशी चर्चा 

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मिहान प्रकल्पात गेलेल्या खापरी रेल्वे गावातील आणि गावठाणातील जमिनीचे भूसंपादन झाले आहे. पण गावठाणाशेजारी असलेल्या ३२२ कुटुंबांचे मात्र अजूनही भूसंपादन झालेले नाही. ही जमीन प्रकल्पात गेली आहे. या ३२२ कुटुंबांना सानुग्रह अनुदान देऊन त्यांची जमीन या प्रकल्पासाठी घेता येईल, असा प्रस्ताव तयार करण्यात येणार करण्यात येणार आहे.यासंदर्भात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अति. जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी भूसंपादन रवींद्र कुंभारे यांच्याशी या प्रस्तावासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेत सानुग्रह अनुदान देता येऊ शकते, ही बाब स्पष्ट झाली आहे. चर्चेत शिवणगावची जमीन भूसंपादित करताना प्रकल्पासाठी अनेक झोपडपट्ट्यांच्याी जमिनी घेण्यात आल्या. त्यावेळीही या झोपडपट्टीधारकांना सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. गावठाणाबाहेरील जमिनीचे पट्टे ज्या नागरिकांकडे आहे, पण या जागेची शासनाकडे नोंद ही शासकीय जागा असल्यामुळे या जागेचे भूसंपादन करता येत नाही. जागेच्या बदल्यात प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान देऊन यापूर्वी प्रकल्पग्रस्तांसाठीचे ज्याप्रमाणे पुनर्वसन झाले, त्याचप्रमाणे ३२२ कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. याप्रकरणी चर्चेच्या वेळी प्रकल्पग्रस्तांचे नेते केशव सोनटक्के, पंचायत समिती सदस्य सुनीता बुचुंडे व अन्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना वस्तुस्थिती समाजावून सांगितली. सानुग्रह अनुदान आणि भूसंपादनानंतर मिळणारा मोबदला सारखाच असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. म्हाडाकडून पुनर्वसनासाठी कारवाई नाहीखापरीजवळ मिहान प्रकल्पात म्हाडाची एक वसाहत जात आहे. या ठिकाणी म्हाडाने सुमारे २५० घरकुले बांधली आहेत. अनेकांनी येथे घरे घेऊन ठेवली, पण ते राहात नाही. सध्या ३५ ते ४० कुटुंबे या वसाहतीत राहतात. म्हाडा प्रशासनाला ही जागा मिहानने मागितली. या वसाहतीतील कुटुंबांचेही पुनर्वसन करावे लागणार आहे. पण म्हाडा कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे म्हाडाच्या वसाहतीचे प्रकरण भिजत घोंगडे ठरले आहे. या वसाहतीतील लोकांचे पुनर्वसन करताना त्यांना जमिनीचे आणि घरांचे पैसे द्यावे लागणार आहेत. याच वसाहतीत काही खुली जागा आहे, ती जागाही प्रकल्पात गेली आहे.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर