शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

संसर्गाच्या भीतीमुळे नागपूर विभागात ३१६ रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:24 IST

अवयवदानात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानी आले आहे. परंतु यंदा दोनच रुग्णाकडून अवयवदान होऊ शकले.

ठळक मुद्दे९६ रुग्णांना हवे यकृतअडीच महिन्यापासून विदर्भात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व समाजात रुजत असतानाच ‘लॉकडाऊन’मुळे व रुग्णाला संसर्ग होण्याच्या भीतीने गेल्या अडीच महिन्यापासून विदर्भात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद पडली आहे. परिणामी, मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची संख्या ३१६ तर यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची संख्या ९६ वर पोहचली आहे. मृत्यूच्या दाढेत हे रुग्ण जगत आहेत. अवयवदानात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानी आले आहे. ‘झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटी’ नागपूरच्या (झेडटीसीसी) अथक परिश्रमामुळे हे शक्य होऊ शकले. विशेष म्हणजे, २०१३ मध्ये ‘झेडटीसीसी’ कार्याला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी एकाच व्यक्तीकडून अवयवदान झाले. मात्र, त्यानंतर अवयवदानाची ही चळवळ वाढत गेली. २०१४ मध्ये तीन, २०१५ मध्ये चार, २०१६ मध्ये सहा, २०१७ मध्ये १४, २०१८ मध्ये १८ तर २०१९ मध्येही १८ ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदान करण्यात आले. परंतु यंदा दोनच रुग्णाकडून अवयवदान होऊ शकले.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २० वर रुग्णांची प्रतीक्षादोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ६३ मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहेत. परंतु येथेही मार्च महिन्यापासून मूत्रपिंड प्रत्यारोपण थांबविण्यात आले आहे. विशेष म्हणजे येथील २० वर रुग्णांकडे अवयवदाता उपलब्ध आहे.

सहा वर्षात १११ मूत्रपिंड, ४७ यकृत, १२ हृदय, तीन फुफ्फुसाचे प्रत्यारोपण२०१३ ते २०१९ या कालावधीत नागपूर विभागात १०९ मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झाले. याच कालावधीत १२ हृदय काढण्यात आले. यातील तीन चेन्नई, एक दिल्ली, आठ मुंबईत तर एक हृदय प्रत्यारोपण नागपूर विभागात करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत ४७ यकृत मिळाले. यातील पाच पुणे, एक औरंगाबाद, सहा मुंबई तर गेल्या दोन वर्षांत नागपूर विभागात ३५ यकृताचे प्रत्यारोपण झाले. आतापर्यंत केवळ तीनच फुफ्फुसाचे दान झाले. यातील दोन मुंबई तर तिसरे तेलंगणा विभागात प्रत्यारोपण झाले. यावर्षी दोन अवयवदात्याकडून मिळालेल्या चार मूत्रपिंड, दोन यकृताचे दान होऊ शकले. यामुळे मोठ्या संख्येत रुग्ण अवयवाच्या व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रत्यारोपण सुरू करणे शक्यप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जे औषधे दिले जाते त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी, कोविड-१९ चा धोका होण्याची शक्यता अधिक राहते. यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. परंतु आता प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू केल्या जाऊ शकतात.- डॉ. संजय कोलते, सचिव, ‘झेडटीसीसी, नागपूर झोन

अत्यंत गरजू रुग्ण समोर आला नाहीया अडीच महिन्याच्या काळात प्रत्यारोपणासाठी किंवा अवयवासाठी अत्यंत गरजू रुग्ण झेडटीसीसीकडे आला नाही. असा रुग्ण पुढे आला असता तर नक्कीच मदत केली असती. परंतु आता कोविडशी लढा देत अवयवदानाला व प्रत्यारोपणाला गती दिली जाईल.- डॉ. विभावरी दाणी, अध्यक्ष, झेडटीसीसी, नागपूर झोन

टॅग्स :Healthआरोग्य