दोन दिवसात ३१ रेल्वेगाड्या रद्द

By Admin | Updated: July 4, 2015 03:04 IST2015-07-04T03:04:37+5:302015-07-04T03:04:37+5:30

इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आलेली नाही.

31 trains canceled in two days | दोन दिवसात ३१ रेल्वेगाड्या रद्द

दोन दिवसात ३१ रेल्वेगाड्या रद्द

प्रवाशांची गैरसोय : प्रवाशांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध
नागपूर : इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळे ४ आणि ५ जुलैला एकुण ३१ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १७ जूनला इटारसी रेल्वेस्थानकाजवळील रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागली होती. त्यानंतर नागपूर-इटारसी मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. विस्कळीत झालेली वाहतूक अद्यापपर्यंत रुळावर आलेली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांची माहिती मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक तसेच नागपूर रेल्वेस्थानकावर मदत केंद्र सुरू केले आहे.
४ जुलैला रद्द केलेल्या रेल्वेगाड्या
१२७०८ निजामुद्दीन-तिरुपती एक्स्प्रेस
१२७०७ तिरुपतीा-निजामुद्दीन एक्स्प्रेस
१२५११ गोरखपूर-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस
१७६१० पूर्णा-पटना एक्स्प्रेस
११०४५ कोल्हापूर-धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेस
१२६८८ डेहराडून-मदुराई एक्स्प्रेस
१२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस
१२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस
१२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस
१२१९४ जबलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस
११२०४ जयपूर-नागपूर एक्स्प्रेस
१४०१० दिल्ली-छिंदवाडा पाताळकोट एक्स्प्रेस
५९३८६ छिंदवाडाा-इंदोर पंचवेली पॅसेंजर
१२७९१ सिकंदराबाद-पटना एक्स्प्रेस
१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस
१८४७४ जोधपूर-पुरी एक्स्प्रेस.

Web Title: 31 trains canceled in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.