मास्कशिवाय फिरणाऱ्या ३१जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:08 IST2021-04-08T04:08:55+5:302021-04-08T04:08:55+5:30

लोकमत न्यूज् नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ३१ नागरिकांकडून १५ हजार ...

31 fined for walking without mask | मास्कशिवाय फिरणाऱ्या ३१जणांना दंड

मास्कशिवाय फिरणाऱ्या ३१जणांना दंड

लोकमत न्यूज् नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ३१ नागरिकांकडून १५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कसुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३७,२२० नागरिकांविरुध्द कारवाई करुन १ कोटी ६९ लाखाचा दंड वसूल केला आहे.

शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २, धरमपेठ ५, धंतोली ३, नेहरुनगर ४, गांधीबाग ३, आशीनगर ६, मंगळवारी झोन अंतर्गत ७ आणि मनपा मुख्यालयातील १ जणांविरुध्द ही कारवाई केली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ३१७५० नागरिकांकडून १ कोटी ५८ लक्ष ७५ हजार वसूल करण्यात आले आहेत.

Web Title: 31 fined for walking without mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.