३०.९७ लाखाच्या साहित्याची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:57+5:302021-04-04T04:08:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बेला : कंटेनरमधील साहित्य नियाेजित स्थळी पाेहाेचविण्याऐवजी त्याची मध्येच विल्हेवाट लावण्यात आली. यात कंटेनरचालकांनी ३० लाख ...

३०.९७ लाखाच्या साहित्याची अफरातफर
लाेकमत न्यूज नेटवर्क
बेला : कंटेनरमधील साहित्य नियाेजित स्थळी पाेहाेचविण्याऐवजी त्याची मध्येच विल्हेवाट लावण्यात आली. यात कंटेनरचालकांनी ३० लाख ९७ हजार ६३३ रुपये किमतीच्या साहित्याची अफरातफर केली आहे. हा प्रकार बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बाेरखेडी शिवारात नुकताच घडला.
सनीकुमार राजू खातरकर (३१, रा. साेनपूर, छिंदवाडा, मध्य प्रदेश) यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेसचे काही लगेज एचआर-५५/एडी-४४६४ क्रमांकाच्या कंटेनरने चेन्नईहून नागपूरला पाठविले हाेते. सुरेशकुमार छाेटेलाल (४०, रा. महुवागाव, जिल्हा कानपूर, उत्तर प्रदेश) व प्रीतमलाल बद्री (४६, रा. फत्तेपूर, जिल्हा कानपूर, उत्तर प्रदेश) हे दाेघेही त्या कंटेनरवर चालक हाेते. या दाेघांनीही या कंटेनरमधील संपूर्ण साहित्य नागपूर येथील नियाेजित स्थळी पाेहाेचविले नाही. शंका आल्याने सनीकुमार यांनी चाैकशी केली. तेव्हा दाेन्ही कंटेनरचालकांनी त्या कंटेनरमधील आठ विविध लगेजमधील ७९ नगांची बाेरखेडी टाेल नाक्याच्या आधी परस्पर विल्हेवाट लावली. त्या ७९ नगांची एकूण किंमत ३० लाख ९७ हजार ६३३ रुपये असल्याचे सनीकुमार खातरकर यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी बेला पाेलिसांनी दाेन्ही कंटेनरचालकाविरुद्ध भादंवि ४०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक पंकज वाघाेडे करीत आहेत.