३० तरुणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST2021-06-22T04:07:00+5:302021-06-22T04:07:00+5:30

कामठी : काेराेना संक्रमण काळात रक्ताची गरज निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेता युवक काँग्रेसच्या कामठी शाखेच्यावतीने कामठी शहरात रक्तदान ...

30 young people donated blood | ३० तरुणांनी केले रक्तदान

३० तरुणांनी केले रक्तदान

कामठी : काेराेना संक्रमण काळात रक्ताची गरज निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेता युवक काँग्रेसच्या कामठी शाखेच्यावतीने कामठी शहरात रक्तदान शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह ३० तरुणांनी रक्तदान केले.

युवक काॅँग्रेसचे प्रदेश महासचिव इरसाद शेख यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराला सुरुवात केली. त्यांनी काेराेना संक्रमण काळात १२ वेळा रक्तदान केल्याने त्यांचा नागपूर येथील जीएसके ब्लड बँकेच्यावतीने गाैरव करण्यात आला. डॉ. आशिष खंडेलवाल व डॉ. गणेश खंडेलवाल यांच्या नेतृत्वातील चमूने रक्तसंकलन जबाबदारी पार पाडली. शिबिराच्या यशस्वितेसाठी नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा यादव, प्रदेश सेवादल महासचिव राजकुमार गेडाम, सलमान अली, रशिद अन्सारी, येतेशाम अन्सारी, मोहम्मद सलमान खान, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुरय्या बानो, करार हैदर, अफसर खान, इरफान अहमद, सुजित कुंडू, फारमान खान, जुबेर शरीफ, आजान खान यांनी सहकार्य केले.

===Photopath===

210621\img-20210620-wa0122.jpg

===Caption===

रक्तदान शिबिरात रक्तदान करताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी

Web Title: 30 young people donated blood