३० हजार विद्यार्र्थ्यांना गणवेश मिळणार

By Admin | Updated: July 2, 2014 00:54 IST2014-07-02T00:54:40+5:302014-07-02T00:54:40+5:30

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे इतर मागासवर्गीय (ओबीसी) व खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय जिल्हा

30 thousand students will get uniforms | ३० हजार विद्यार्र्थ्यांना गणवेश मिळणार

३० हजार विद्यार्र्थ्यांना गणवेश मिळणार

जिल्हा परिषद : डीपीसीला प्रस्ताव सादर करणार
नागपूर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे इतर मागासवर्गीय (ओबीसी) व खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीने घेतला आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता १ ली ते आठवीमधील अनुसूचित जाती-जमातीचे विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप केले जाते. परंतु शाळेत एकाच वर्गात असलेल्या ओबीसी व खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. गरज असूनही गणवेश मिळत नसल्याने याचा या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो. वर्गातील वातावण कलुषित होते. त्यामुळे सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची मागणी समिती सदस्यांनी बैठकीत केली. त्यानुसार डीपीसीकडून निधी उपलब्ध करण्याला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील जि.प.शाळेत शिक्षण घेत असलेल्या ओबीसी व खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ३० हजारांवर आहे. गणवेशासाठी प्रत्येकी ४०० रुपये अनुदान विचारात घेता १,२०,००००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एकाला गणवेश दिला तरी ६० लाखांचा निधी लागणार आहे. परंतु निधी मिळणार असला तरी प्रक्रि येला काही महिने लागतील. तोवर विद्यार्थ्यांना गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने विकासकामासाठी आग्रह सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 30 thousand students will get uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.