शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वायुप्रदूषणामुळे ३० टक्के लोकांना पक्षाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 07:07 IST

जगात दरवर्षी ९० लाख लोक वायुप्रदूषणाने मृत्यूमुखी पडतात.

नागपूर : वायुप्रदूषणाचे दुष्परिणाम अलीकडे मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागले आहेत. मेंदूरोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार आणि कॅन्सर होण्यामागे वायुप्रदूषण हे महत्त्वाचे कारण असल्याचे संशोधनातून सामोर आले आहे. जगात दरवर्षी ९० लाख लोक वायुप्रदूषणाने मृत्यूमुखी पडतात. एकट्या भारतात ही संख्या १८ लाख आहे, तर जगात ३० टक्के लोकांना पक्षाघात म्हणजेच ‘पॅरालिसिस’ वायुप्रदूषणामुळे होतो. यामुळे प्रदूषणाला घेऊन जनजागृती होणे व त्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक झाले आहे, अशी माहिती जागतिक ट्रॉपिकल न्यूरॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.‘वर्ल्ड फेडेरेशन आॅफ न्यूरॉलॉजी’ व ‘इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरॉलॉजी’च्या वतीने २२ जुलै हा दिवस जागतिक मेंदू दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूरोलॉजीच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला.डॉ. मेश्राम म्हणाले, ‘निरोगी मेंदूकरिता स्वच्छ हवा’ हे या वर्षीचे घोषवाक्य आहे. १२० देशात हा उपक्रम राबविला जाणार आहे. ‘वर्ल्ड फेडेरेशन आॅफ न्यूरॉलॉजी’चे अध्यक्ष डॉ विलियम कॅरोल म्हणाले, वायुप्रदूषणामुळे वाढती पक्षाघातांची संख्या पाहता वायुप्रदूषणाला घेऊन जनजागृती होणे आवश्यक आहे. ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरॉलॉजी’ने याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.पर्यावरण न्यूरॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. जॅक्स रेइस यांनी सांगितले की, वायुप्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणामुळे होते. जगातील ९० टक्के लोक हे दूषित हवेत श्वास घेतात. जगातील ३० कोटी लोक हे आपल्या घरात स्वयंपाकाकरिता नकळत हानीकारक इंधनाचा वापर करतात, त्यामुळे घरातील तसेच परिसरातील हवा दूषित होते. भारतात दोन ते तीन घरात या हानीकारक इंधनाचा वापर होतो.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणpollutionप्रदूषण