औषधांसाठी ३० कोटी मिळणार : १६ कोटींची थकीत बिलेही मंजूर

By Admin | Updated: June 26, 2015 02:40 IST2015-06-26T02:40:28+5:302015-06-26T02:40:28+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (मेडिकल) गुरुवार हा ‘सोन्याचा दिवस’ ठरला.

30 crores for drugs: 16 crores worth of bills approved | औषधांसाठी ३० कोटी मिळणार : १६ कोटींची थकीत बिलेही मंजूर

औषधांसाठी ३० कोटी मिळणार : १६ कोटींची थकीत बिलेही मंजूर

मेडिकलला ग्लूकोज !
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (मेडिकल) गुरुवार हा ‘सोन्याचा दिवस’ ठरला. गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीचा परत गेलेला २२ कोटीचा निधी, औषध पुरवठादारांचे थकीत असलेले १६ कोटी आणि औषधावरील खर्च वाढवून तो ३० कोटी रुपये करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्याचे पत्र गुरुवारी धडकले. यात भर म्हणजे, काही महिन्यांपासून निधीअभावी रखडलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या नवीन सुधारित बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे पत्रही प्राप्त झाले.
मेडिकलमध्ये तब्बल पाच वर्षानंतर अभ्यागत मंडळाची बैठक २६ जून रोजी होण्ाांर होती. अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ही पहिली बैठक होती. त्या अनुषंगाने हा निधी मिळाल्याचे बोलले जात आहे.
गोरगरिबांचे रु ग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकल रु ग्णालयाला उपकरणे खरेदी व आवश्यक बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने गेल्या वर्षी २२ कोटीचा निधी दिला. परंतु ३१ मार्चपर्यंत याच्या खर्चाला प्रशासकीय मान्यताच मिळाली नाही. यामुळे हा निधी परत गेला. गुरुवारी हा निधी पुन्हा मिळाल्याचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दिली.(प्रतिनिधी)
‘ट्रामा’साठी १८ कोटी
अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना व विविध आजाराच्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे आणि त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी मेडिकलमध्ये ट्रामा केअर सेंटरचे कार्य हाती घेण्यात आले. परंतु बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही त्यात अनेक त्रुटी राहिल्याने या ‘सेंटर’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, गुरुवारी ट्रामाच्या नवीन सुधारित बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे व त्यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पत्र मिळाल्याचे डॉ. निसवाडे यांनी सांगितले.

Web Title: 30 crores for drugs: 16 crores worth of bills approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.