शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील ३० लाख मंदिरे घडवू शकतात समाजात क्रांतिकारी बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 07:00 IST

Nagpur News विद्यापीठांनी टेंपल मॅनेजमेंट अभ्यासक्रम स्वीकारावा. त्यातून घडलेली नवी पिढी या कार्यात उतरली तर हीच ३० लाख मंदिरे देशात क्रांतिकारी बदल घडवू शकतील, असा विश्वास अणुशास्त्रतज्ज्ञ डाॅ. सुरेश हावरे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम विद्यापीठांनी स्वीकारावा

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : देशभरात मंदिरांची संख्या थोडीथोडकी नव्हे तर ३० लाखांवर आहे. लहान-मोठी मंदिरे मिळून ती एक कोटीपर्यंत जाईल. मंदिरांना येणारी रोजची देणगी कोटींच्या घरात आहे. मंदिरे ही श्रद्धास्थाने असली तरी अपवाद वगळता एकसूत्रपणा, योग्य व्यवस्थापनाचा अभाव असल्याने मंदिरे आणि त्यांच्या संपत्तीचा पुरेसा वापर समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावा तसा होत नाही. यासाठी विद्यापीठांनी टेंपल मॅनेजमेंट अभ्यासक्रम स्वीकारावा. त्यातून घडलेली नवी पिढी या कार्यात उतरली तर हीच ३० लाख मंदिरे देशात क्रांतिकारी बदल घडवू शकतील, असा विश्वास श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे माजी अध्यक्ष तथा अणुशास्त्रतज्ज्ञ डाॅ. सुरेश हावरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे चार वर्षे अध्यक्षपदावर काम करताना आलेल्या अनुभवावरून टेंपल मॅनेजमेंट फार मोठा विषय असल्याची जाणीव झाल्याचे सांगून डॉ. हावरे म्हणाले, बिझिनेस मॅनेजमेंटमधील मॅनपॉवर, मशिनरी, मनी, मटेरिअल आणि मार्केटिंग ही पाचही तत्त्वे टेंपल मॅनेजमेंटमध्येही लागू होतात. व्यवस्थापनाचे पाचही अंग लागू असलेल्या या क्षेत्राचा आजवर कुणी अभ्यासच केला नव्हता. त्यातून ‘टेंपल मॅनेजमेंट’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे ते म्हणाले. हा अभ्यासक्रम देशातील विद्यापीठांनी स्वीकारावा, यासाठी अलीकडेच नागपूरसह अमरावती, पुणे तसेच विद्यालंकार विद्यापीठ, मुंबई येथील कुलगुरूंशी चर्चा केली. ‘एमबीए इन टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास या क्षेत्रात सुजाण पिढी निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबत मंदिरांच्या संपत्तीचा समाजासाठी योग्य वापर होईल आणि देशात क्रांतिकारी बदल घडेल, असे ते म्हणाले.

टेंपल टुरिझमही दुर्लक्षित

डॉ. सुरेश हावरे म्हणाले, देशात अनेक सुंदर व ऐतिहासिक मंदिरे आहेत. ती देशाची संस्कृती सांगतात. विदेशात मंदिरांचे ऑडिओ गॅझेट असल्याचे आपण पाहिले आहे. त्यातून मंदिरे, मूर्तींचा इतिहास कळतो. मात्र, पर्यटकांपर्यंत पोहाेचण्यासाठी आपल्याकडे या तंत्राचा अभाव आहे. या अभ्यासक्रमातून बराच वाव आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा मंदिरेच जपू शकतात.

सेवाभिमुख कार्याला वाव

मंदिरांचा चेहरा सेवाभिमुख आणि समाजाभिमुख व्हावा. अन्नदान, शाळा-महाविद्यालये, आरोग्यसेवा, क्षेत्रीय गरजेनुसार सामाजिक उपक्रम चालतात. असे उपक्रम सर्वच मंदिरांमधून चालविण्यासाठी उत्तम व्यवस्थापनाची गरज आहे. ती अभ्यासक्रमातूनच पूर्ण होऊ शकते. मंदिरात येणारे स्वेच्छेने आणि भक्तिभावाने येतात. त्यांच्या भावनांचे बाजारीकरण न करता श्रद्धा व भावनेचा आदर व्हावा. मंदिरे ही समाजाची ॲसेट्स आहेत. त्यांचा योग्य वापर झाला तर मंदिरात दानपेटी हवी कशाला, असे विचारणाऱ्यांना उत्तर मिळेल, असेही डॉ. हावरे म्हणाले.

टॅग्स :Templeमंदिर