हिंगण्यात २९ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST2021-03-17T04:09:06+5:302021-03-17T04:09:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : जिल्हा प्रशासनाने नागपूर पाेलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आठवडाभराचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या अंतर्गत मंगळवारी ...

हिंगण्यात २९ हजारांचा दंड वसूल
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : जिल्हा प्रशासनाने नागपूर पाेलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आठवडाभराचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या अंतर्गत मंगळवारी (दि.१६) नाकाबंदीच्या दुसऱ्या दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७२ जणांवर दंडात्मक कारवाई करीत, त्यांच्याकडून २९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना लाॅकडाऊनचे गांभीर्य पटवून दिले.
लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पाेलीस ठाणे समाेरील रस्ता व शिवाजी महाराज चाैक बसस्थानक परिसरात पाेलिसांनी नाकाबंदी लावून तपासणी केली. पाेलीस निरीक्षक सरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस हवालदार कमलाकर वंजारी, साेमेश्वर काेल्हे, नीलेश जंजाळ, ओमप्रकाश थाेरात, कमलेश ठाकरे व पाेलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत विना हेल्मेट, विनामास्क फिरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७२ जणांकडून २९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. हिंगणा पाेलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये नियमाबाबत जागृतीचे वातावरण दिसून आले, तसेच विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, इतर सर्व प्रतिष्ठाने बंद हाेती.