मास्क न लावणाऱ्या २९ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:08 IST2021-04-21T04:08:24+5:302021-04-21T04:08:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या २९ नागरिकांना १४ ...

29 people fined for not wearing mask | मास्क न लावणाऱ्या २९ जणांना दंड

मास्क न लावणाऱ्या २९ जणांना दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या २९ नागरिकांना १४ हजार ५०० रुपयांचा दंड केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३७ हजार ६०५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ७१ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ४, धंतोली झोन २, नेहरूनगर झोन ६, गांधीबाग झोन ४, सतरंजीपुरा झोनअंतर्गत ३, लकडगंज झोन, मंगळवारी, धरमपेठ व हनुमाननगर झोनअंतर्गत प्रत्येकी १ जणाविरुद्ध ही कारवाई केली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई सुरू आहे.

Web Title: 29 people fined for not wearing mask