२७० किलो भेसळयुक्त तूप जप्त
By Admin | Updated: July 10, 2014 00:45 IST2014-07-10T00:45:51+5:302014-07-10T00:45:51+5:30
कमी खर्चात अधिक पैसे कमविण्याच्या उद्देशाने भेसळयुक्त तूप विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तीन व्यक्तिंना फे्रजरपुरा पोलिसांनी बुधवारी अटक केली. इंदला परिसरातील या आरोपींकडून

२७० किलो भेसळयुक्त तूप जप्त
तीन आरोपींना अटक : फे्रजरपुरा पोलिसांची कारवाई
अमरावती : कमी खर्चात अधिक पैसे कमविण्याच्या उद्देशाने भेसळयुक्त तूप विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तीन व्यक्तिंना फे्रजरपुरा पोलिसांनी बुधवारी अटक केली. इंदला परिसरातील या आरोपींकडून पोलिसांनी २७० किलो भेसळयुक्त तूप जप्त केले. ऐन सणासुदीच्या तोंडावर हे बनावट तूप ग्राहकांच्या माथी मारण्याचा आरोपींचा प्रयत्न यामुळे फसला.
गोंडप्पा नागोप्पा यमगवळी (६०), बबन गंगाराम घुले व महादेव मराजी काळे (६८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी बनावट तूप विक्रीचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अन्न व औषधी प्रशासन सतर्क होते. विभागाकडून विविध ठिकाणी कारवाईचा सपाटा सुरु होता. याच दरम्यान फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन देशमुख यांना इंदला परिसरात सुरू असलेल्या या भेसळयुक्त तुपाच्या गोेरखधंद्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप राजपूत, एएसआय प्रकाश राठोड, रमेश निंभोरकर, विनय गुप्ता, ओमप्रकाश देशमुख, विलास बाभुळकर, सचिन शेळके, संजय देऊळकर, अमर बघेल, विजय बरडे यांच्या पथकाने इंदला परिसरातील तीन घरांवर छापामार कारवाई करून १५ किलोचे १४ डब्बे आणि १ किलोचे ६० पॅकेट असे २७० किलो भेसळयुक्त तूप फ्रेजरपुरा पोलिसांनी जप्त केले.