२६८.६८ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:06 AM2021-06-24T04:06:54+5:302021-06-24T04:06:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी २६८.६८ कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल (डीपीआर) ...

268.68 crore solid waste management project approved | २६८.६८ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी

२६८.६८ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी २६८.६८ कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल (डीपीआर) स्वच्छ महाराष्ट्र अभियान उच्चाधिकार समितीने आधीच मंजूर केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागातर्फे हा प्रस्ताव ठेवण्यात आला.

शहरातील एकीकृत घनकचरा व्यवस्थापनांतर्गत तयार केलेला प्रस्तावित ३३९ कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान प्राप्त करण्याकरिता शासनाला सादर करण्यात आला होता. या प्रकल्प अहवालास स्थायी समितीने २९ फेब्रुवारी २०१६ रोजी, तर महासभेने १८ मार्च २०१६ रोजी मंजुरी दिलेली आहे. हा प्रकल्प अहवाल स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अर्थात महाराष्ट्र शासनाकडे सादर केला. त्यांनी सुचविल्याप्रमाणे सुधारित प्रकल्प अहवाल ३०८ कोटींचा तयार करण्यात आला. या अहवालास स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत उच्चाधिकार समितीने २२ मार्च २०१६ च्या बैठकीमध्ये मंजुरी दिली. तथापि योजनेच्या निकषानुसार २८८.६८ कोटींचा प्रस्ताव आहे. तसेच व्हीजीएफ म्हणून मनपाला ९६.२२ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. यात शहरात दररोज निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

...

कंपोस्ट खत व बायो सीएनजी निर्मिती

या प्रकल्पांतर्गत शहरात दररोज निघणाऱ्या कचऱ्यापैकी २०० मेट्रिक टन कचऱ्यापासून कंपोस्ट खत, ३००मेट्रिक टन कचऱ्यापासून बायो गॅस, बायो सीएनजी निर्माण होईल. कन्स्ट्रक्शन व डिमोलिशन वेस्ट ट्रिटमेंट प्लांट उभारला जाणार आहे. शहरात निघणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.

...

लवकरच निविदा प्रक्रिया

कचरा प्रक्रिया प्रकल्पापूर्वी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. नंतर हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्याऐवजी बायो गॅसपासून बायो सीएनजी, कंपोस्ट खत, एमआरएफ, आरडीएफ सेंट्रलाईज्ड प्लांट, ग्रीन वेस्ट प्रोसेसर, आदीची व्यवस्था केली जाणार आहे. या प्रस्ताव मंजुरी मिळाल्याने लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होईल. प्रकल्पाचे काम सुरू होण्याला ८ ते १० महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

....

प्रकल्पातील महत्त्वाचे घटक व खर्च

- कचरा संकलन व वाहतुकीसाठी १४३.२५ कोटी

- रस्ते सफाई १.८३ कोटी

- कंपोस्ट खत प्रकल्पासाठी ६ कोटी

वेस्ट ट्रिटमेंट प्लांटसाठी १६.६५ कोटी

-सीएनजी गॅस निर्माण ७५ कोटी

- जनावरांच्या अंतिम संस्कारासाठी ३.५ कोटी

- एमआरएफ व आडीएफ सेंट्रलाईज्ड प्लांटसाठी ६ कोटी

Web Title: 268.68 crore solid waste management project approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.