शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांना २.६४ लाखांची आर्थिक मदत

By आनंद डेकाटे | Updated: May 2, 2024 17:04 IST

विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत विद्यार्थ्यांना दिलासा : कुलगुरूंच्या हस्ते धनादेश वितरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठानेविद्यार्थी कल्याण योजना अंतर्गत तीन विद्यार्थ्यांना एकूण २.६४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. माता मंजुळाबाई विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत ही मदत करण्यात आली. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते गुरुवारी आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.

माता मंजुळाबाई विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत सहायता निधी प्राप्त करणाऱ्यांमध्ये योगिता रवींद्र मोहीनकर, दृष्टी सुरेश नेरीकर व प्रफुल्ल हरिदास चलाख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कुलगुरू कक्षात धनादेश वितरण प्रसंगी विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक व राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. योगिता रवींद्र मोहीनकर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात एमफार्म २ ची विद्यार्थिनी होती. योगिताचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उपचाराकरिता लागलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून तिचे पालक रवींद्र मोहिनकर यांच्या नावे १ लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.सेवादल महिला महाविद्यालयाची २०२३-२४ या शैक्षणिक सत्रातील कला शाखेच्या तृतीय वर्षातील विद्यार्थिनी दृष्टी सुरेश नेरीकर हिला उपचार घेण्याकरिता झालेला खर्च म्हणून १ लाख रुपयांची मदत विद्यार्थी कल्याण योजनेतून करण्यात आली. विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील २०२२-२३ या शैक्षणिक सत्रातील एमए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी प्रफुल्ल हरिदास चलाख या विद्यार्थ्याला अपघात झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याकरिता झालेल्या उपचाराचा खर्च म्हणून ६४ हजार ३४७ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सर्व संलग्नित, संचालित तसेच शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाचा अपघात अथवा मोठ्या आजारात वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून केला जाते. विद्यापीठाकडून राबविला जात असलेल्या विविध विद्यार्थी कल्याण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक यांनी केले आहे.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठuniversityविद्यापीठnagpurनागपूरStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती