ऑनलाईन सुनावणीतून २६२९ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:46+5:302021-01-04T04:07:46+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लॉकडाऊन काळामध्ये ऑनलाईन सुनावणीद्वारे २६२९ प्रकरणे निकाली काढली. कोरोना संक्रमणामुळे लागू लॉकडाऊन ...

2629 cases removed from online hearing | ऑनलाईन सुनावणीतून २६२९ प्रकरणे निकाली

ऑनलाईन सुनावणीतून २६२९ प्रकरणे निकाली

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लॉकडाऊन काळामध्ये ऑनलाईन सुनावणीद्वारे २६२९ प्रकरणे निकाली काढली.

कोरोना संक्रमणामुळे लागू लॉकडाऊन काळात एकूण ८८९१ नवीन प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल झाली होती. दरम्यान, न्यायालयात कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता नवीन व जुन्यासह एकूण १२ हजार ८१४ प्रकरणांवर ऑनलाईन सुनावणी करण्यात आली. त्याद्वारे २६२९ प्रकरणे निकाली निघाली. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात उच्च न्यायालय प्रशासनाला माहिती मागितली होती. त्यांना २८ डिसेंबर रोजी सदर माहिती पुरविण्यात आली.

-------------

६१ हजार प्रकरणे प्रलंबित

कोलारकर यांना देण्यात आलेल्या इतर माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत ५० हजार ३७० दिवाणी व ११ हजार ३८३ फौजदारी अशी एकूण ६१ हजार ७५३ प्रकरणे प्रलंबित होती.

------------

९१५८ प्रकरणे १० वर्षावर जुनी

६१ हजार ७५३ पैकी ९१५८ (दिवाणी-८२९५, फौजदारी-८६३) प्रकरणे १० वर्षावर जुनी आहेत. २१ हजार २१४ (दिवाणी-१८२३४, फौजदारी-२९८०) प्रकरणे ५ वर्षावर तर, ५२ हजार ८६९ (दिवाणी-४४२३३, फौजदारी-८६३६) प्रकरणे एक वर्षावर जुनी आहेत.

Web Title: 2629 cases removed from online hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.