२६ लाखाचे कीटकनाशक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST2020-12-31T04:09:18+5:302020-12-31T04:09:18+5:30

--------- बंद घरात चोरी नागपूर : मोरफाटा येथे दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख रक्कम व सव्वा लाख रुपयांचे दागिने ...

26 lakh pesticides seized | २६ लाखाचे कीटकनाशक जप्त

२६ लाखाचे कीटकनाशक जप्त

---------

बंद घरात चोरी

नागपूर : मोरफाटा येथे दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख रक्कम व सव्वा लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. मीर इरफान अली असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते गुलशननगर येथील रहिवासी आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. लकडगंज पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला.

--------------

प्रसादाच्या रांगेत चेन स्नॅचिंग

नागपूर : दत्तजयंतीच्या प्रसादाकरिता रांगेत लागलेल्या ६१ वर्षीय महिलेची चेन चोरण्यात आली. ही घटना मंगळवारी सुभाष मार्गावरील दत्तमंदिरात घडली. कुंदा प्रदीप सावंत असे महिलेचे नाव आहे. चेनची किंमत २८ हजार रुपये आहे. गणेशपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

-----------

महिलेला २५ लाखांनी फसवले

नागपूर : प्लॉट विक्रीच्या नावावर एका महिलेला २५ लाख रुपयांनी फसविण्यात आले. स्वामी कालीनंद कोरू बिरहा (५५, रा. जबलपूर) व ओझेर अन्सारी (४०, रा. जुना कामठी मार्ग) अशी आरोपींची नावे आहेत. स्मिता विश्वास बनसोडे असे पीडित महिलेचे नाव असून त्या मानेवाडा येथील रहिवासी आहेत. आरोपींनी बनसोडे यांच्यासोबत प्लॉट विक्रीचा करार केला होता. तसेच, बनसोडे यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर बनसोडे यांना प्लॉटचा ताबा देण्यात आला नाही. तसेच, रक्कमही परत करण्यात आली नाही. आरोपींविरुद्ध हिंगणा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: 26 lakh pesticides seized