शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

नागपुरात २६ कोटींचे मेट्रो भवन दोन महिन्यात पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 11:43 IST

दीक्षाभूमीसमोर २६ कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणारे मेट्रो भवनचे बांधकाम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देतीन स्टेशनचे काम ९० टक्के पूर्ण‘जॉय राईड’ पुढील महिन्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीसमोर २६ कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणारे मेट्रो भवनचे बांधकाम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. भवनच्या छतावर नेट मीटरिंगसाठी सोलर पॅनल आणि जमिनीच्या आतील थंडावा ओढून इमारत थंड ठेवण्यासाठी जिओथर्मल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे ऊर्जेची बचत होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मेट्रो स्टेशनच्या पाहणी दौऱ्यानंतर मेट्रो हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.दीक्षित म्हणाले, महामेट्रो साऊथ एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट आणि खापरी एअरपोर्टचे ९० टक्के बांधकाम झाले आहे. ५ कि़मी.च्या जॉय राईडसाठी महामेट्रो सज्ज असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तच्या (सीएमआरएस) अंतिम मंजुरीवर जॉय राईड अवलंबून आहे. सीएमआरएसचा दौरा २० मार्चला होण्याची शक्यता आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महामेट्रोतर्फे नियमित सुरक्षा आॅडिट, आकस्मिक तपासणीसह आतापर्यंत एनसीसी, एफ्कॉन्स, आयटीडी सिमेंटेशन आणि आयएल अ‍ॅण्ड एफएस या कंपन्यांवर ४० लाखांचा दंड आकारला आहे. मेट्रो वाहनाद्वारे मेट्रोच्याच हाईट बॅरिअरला टक्कर मारणाऱ्या वाहनचालकाला निलंबित करण्यात आले आहे.

कॉटन मार्केटमध्ये मेट्रो स्टेशन आणि मल्टी मॉडेल हबदीक्षित म्हणाले, मेट्रो स्टेशन आणि मल्टी मॉडेल हब बनविण्यासाठी कॉटन मार्केटची १७ एकर जमीन मिळाली आहे. नागपूर स्टेशनसमोरील दुकानदारांना आणि एमपी बसस्टॅन्डला शिफ्ट करण्यात येईल. तसेच फुले मार्केट येथील व्यापाऱ्यांना जागा देण्यात येईल. खवा मार्केटची तीन एकर जागा मिळाली आहे. त्या ठिकाणी खवा व्यापाऱ्यांसाठी मोठे मार्केट बनविण्यात येईल.

छत्रपती चौकात दोन सिम्बॉलिक पिलर उभारणारदीक्षित म्हणाले, छत्रपती उड्डाण पूल पाडल्यानंतर त्या ठिकाणी दोन पिलरची ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करणार होतो. पण डबल डेकर पूल तयार करताना दोन्ही पिलरचा अडथळा येत होता. त्यामुळे त्याला २० दिवसांपूर्वी तोडण्यात आले. आता त्या ठिकाणी दोन छोट्या आकाराचे सिम्बॉलिक पिलर बनविण्यात येईल. ते म्हणाले, नागपूरच्या आसपासच्या शहरात लोकल मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे लवकरच पाठविण्यात येईल. रेल्वेची मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील.

चीनमध्ये तयार होतेय कोचचे मॉडेलदीक्षित म्हणाले, चीनची मेट्रो रेल्वे कंपनी सीआरआरसीने नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी कोचचे मॉकअप (मॉडेल) बनविणे सुरू केले आहे. हे मॉडेल १५ एप्रिलपर्यंत तयार होेईल. तयार कोच सप्टेंबरपासून नागपुरात येतील. नागपूर मेट्रोकरिता सीआरआरसीकडून जवळपास ८५० कोटी रुपयात ६९ कोच (२३ मेट्रो ट्रेन) खरेदी केल्या आहेत. सीआरआरसी नागपुरात कोच कारखाना सुरू करण्यास सकारात्मक आहे. महाराष्ट्र सरकारकडून मुंबई मेट्रोकरिता कोचचा आॅर्डर मिळावा, अशी कंपनीला अपेक्षा आहे. कचरापारा (प. बंगाल) येथील रेल्वेची निविदा रद्द झाल्याने आणि अहमदाबाद येथे सीआरआरसीला टेंडर न मिळाल्याने कंपनी नागपुरात कारखाना सुरू करण्यास इच्छुक नसल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

तीन स्टेशनचे बांधकाम एप्रिलपर्यंत पूर्ण होणारसाऊथ एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट आणि खापरी येथे स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू असून एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. आतापर्यंत ९० टक्के बांधकाम पूर्ण आहे. खापरी स्टेशन बांद्रा स्टेशनच्या व्हिक्टोरियन आर्किटेक्चरवर आधरित आणि न्यू एअरपोर्ट स्टेशन बुद्धिस्ट थीमवर असून तशी रचना आहे. साऊथ एअरपोर्ट स्टेशनवर व्यावसायिक उपयोगासाठी १० हजार चौरस फूट हॉलची निर्मिती केली आहे. तसेच एस्केलेटर, लिफ्ट, वॉशरूम, ड्रिंकिंग वॉटर फाऊंटेन, सायकल ट्रॅक, सायकल डॉकिंग स्टेशन, बस बेस, तिकीट काऊंटर, दिव्यांगांसाठी विशेष प्रकारच्या टाईल्स, एएफसी गेट, डोर फ्रेम मेटल डिटेक्टर आदींची व्यवस्था आहे. साऊथ एअरपोर्ट स्टेशनवर फूटओव्हर ब्रिज तर अन्य दोन स्टेशनवर सब-वे बनविण्यात आले आहे. न्यू एअरपोर्ट स्टेशनवर चिचभुवन येथील लोकांसाठी आरयूबी बनविण्यात येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर