शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

विदर्भ राज्यासाठी २५ ला रेल रोको आंदोलन : विदर्भवाद्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 21:51 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २५ फेब्रुवारीला मनीषनगर रेल्वे फाटक, वर्धा रोड येथे रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देहजारो कार्यकर्ते होणार सहभागी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २५ फेब्रुवारीला मनीषनगर रेल्वे फाटक, वर्धा रोड येथे रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. आंदोलनात हजारो विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे संयोजक राम नेवले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.नेवले यांनी यावेळी भाजपाचे विदर्भातील नेते आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या पुढाऱ्यांनी विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन पाळले नाही. केंद्रीय नेतृत्वाने जनतेच्या भावना समजून घेतल्या नाही, त्यामुळे एकामागून एक राज्य त्यांच्या हातातून जात असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही तर विदर्भातूनही त्यांचा सफाया होईल, असा इशारा त्यांनी दिला. सर्वच पक्षाचे पुढारी व सर्व पक्षीय सरकारने विदर्भ राज्य निर्मितीचा प्रश्न टाळल्याचा आरोप डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला. भाषेचे कारण देऊन विदर्भाच्या मागणीला बगल दिली जाते. मात्र ६० वर्ष विदर्भावर झालेल्या अन्यायाचा महाराष्ट्रावाद्यांनी हिशेब द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले. नवीन राज्याची निर्मिती करणे केंद्र शासनाच्या अधिकारात येते. त्यामुळे केंद्राची रेल्वे रोखून त्यांना विदर्भाच्या आंदोलनाचा इशारा दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. २५ रोजी दुपारी १२ वाजता संपूर्ण विदर्भातून आलेले विदर्भवादी कार्यकर्ते मनीषनगर रेल्वे फाटकाजवळ एकत्र येतील आणि लगेच आंदोलनाला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांवर विजेचे युनिट वाढवून २२ हजार कोटी आणि राज्या शासनातर्फे मिळालेले सबसीडीचे ८ हजार कोटी असे ३० हजार कोटी लुटल्याचा आरोप डॉ. खांदेवाले यांनी केला. त्यामुळे विदर्भाच्या मागणीसह विदर्भातील जनतेला २०० युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, २०० युनिटनंतरचे दर निम्मे करावे, शेतीपंपाचे बिल माफ करावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद करण्यात यावे आदी मागण्याही समोर ठेवण्यात आल्या आहेत. पत्रपरिषदेला प्रबीरकुमार चक्रवर्ती, रंजना मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासुरकर, विष्णूजी आष्टीकर, गुलाबराव धांडे, प्रशांत मुळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भrailwayरेल्वेagitationआंदोलन