मानेवाडा-बेसा प्रभागात २५ लाखांची विकासकामे
By Admin | Updated: September 5, 2014 01:09 IST2014-09-05T01:09:32+5:302014-09-05T01:09:32+5:30
प्रभाग ६७ मानेवाडा येथे आ. दीनानाथ पडोळे यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांची विकास कामे केली जात आहे. या कामांचे भूमिपूजन आ. पडोळे यांच्याहस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक

मानेवाडा-बेसा प्रभागात २५ लाखांची विकासकामे
नागपूर : प्रभाग ६७ मानेवाडा येथे आ. दीनानाथ पडोळे यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांची विकास कामे केली जात आहे. या कामांचे भूमिपूजन आ. पडोळे यांच्याहस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक सुभाष भोयर, गुल्लु तुमसरे, देवेंद्र नागपुरे, चंद्रशेखर हिंगणीकर, अश्विनकुमार इंगोले आदी यावेळी उपस्थित होते.
मानेवाडा प्रभागातील बहुतांश परिसर हा आरक्षित असून येथे महापालिका व नासुप्र काम करू शकत नाही़ त्याच प्रभागात मानेवाडा-बेसा रोड पुलाचे काम सुरू आहे. या प्रभागात गेल्या पाच वर्षात २५ कोटींची कामे करण्यात आल्याचे आ. पडोळे यांनी भूमिपूजनप्रसंगी सांगितले.
अभिजित नगर येथे रस्ते नव्हते़ पडोळे यांनी येथील रस्त्यांच्या खडीकरणासासाठी १० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला.
सांदेकर ले-आऊट येथे सुध्दा रस्ते नव्हते. यासाठी ८ लाख रुपये दिले. या ले-आऊट मधील रस्त्यांच्या खडीकरणासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सांदेकर यांनी आ. पडोळे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला़
आराधना नगर येथे रस्त्यांच्या खडीकरणासाठी १२ लाख रुपये दिले. राधानंद नगर, श्रीकृष्ण नगर येथील प्रस्तावित विकास कामांसाठी येथील कॉंगे्रस कार्यकर्ते देवेंद्र नागपुरे हे पाठपुरावा करीत असुन ही विकास कामे आगामी कालावधीत करण्यात येतील़, असे पडोळे यांनी या वेळी आश्वस्त केले.
भूमिपूजन समारंभास गहुकर गुरुजी, हुकूमचंद बिसेन, चंद्रकांत झोड, प्रशांत गाडगीळ, शरद वाके, अविनाश गुरव, राजकुमार कोथडे, धनराज यावलकर, नारायण हेमनेजी, महेश भगत, पुरुषोत्तम पाटील, मिलिंद दुधगावकर, आशीष वैद्य, कश्यप झाडे, सतीश गाडेकर, खोब्रागडे, केशरजी, मन्नु सोनवाणे, मिश्रा, शेंडे, चौरे, चौबे, पवार, दीपक वडस्कर, दंते, मते, बडे आदी उपस्थित होते़