शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी देवी मंदिरातील २५ कर्मचाऱ्यांना उपवासाच्या फराळातून विषबाधा

By जितेंद्र ढवळे | Updated: April 11, 2024 21:41 IST

- शिंगाडा व राजगिऱ्याच्या पीठाच्या खाल्ल्या पुऱ्या

नागपूर: कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे काम करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना उपवासाच्या फराळातून गुरुवारी विषबाधा झाली. सर्व रुग्णांना गणेश नगरी, कोराडी येथील नंदिनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी चार ते पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आल्याची माहिती नंदिनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजय सिंग यांनी दिली.

चैत्र नवरात्रोत्सव सुरू असल्याने मंदिरात काम करणारे पुजारी, अधिकारी व कर्मचारी यांना संस्थानच्या वतीने सकाळी उपवासाचे फराळ तर सायंकाळी जेवण दिले जाते. संस्थानच्या स्वयंपाक प्रसादालयातून ही जेवणाची व्यवस्था केली जाते. इतर भाविकांच्या जेवणाची व्यवस्था ही अन्नछत्रामधून केली जाते.

गुरुवारी सकाळी उपवासाचे फराळ म्हणून संस्थानच्या स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शिंगाड्याचे व राजगिऱ्याचे पीठ मिसळून त्याच्या पुऱ्या तयार केल्या तर बटाट्याचे भरीत तयार करण्यात आले. पुजारी, व्यवस्थापक इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी १२ नंतर फराळ घेतला. दोन-तीन तासाने अनेकांना मळमळ व चक्कर यायला लागले. मंदिर प्रशासनाच्या वतीने या सर्वांना तत्काळ येथील नंदिनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वयंपाक्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून हे फराळ बनवण्यात आले होते. साहित्य पुरवण्याची जबाबदारी एका विश्वस्ताकडे सोपविण्यात आली आहे. नागपूरवरून या साहित्याचा पुरवठा केला जातो. पोलिसांनी या सर्वांचे बयाण नोंदविले आहेत.फराळाच्या साहित्याची तपासणी करणार

यासंदर्भात संस्थानचे सचिव दत्तू समरीतकर यांनी या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, तसेच फराळामध्ये वापरण्यात आलेले साहित्य तपासले जाईल. अन्न व औषध प्रशासनाकडून या सर्व बाबीची चौकशी केल्या जाईल. प्राथमिक अंदाजानुसार शिंगाड्याच्या पिठातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे. परंतु याबाबत संबंधितांकडून तपासणी अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल.

सर्व रुग्णांना सारखीच लक्षणे असून फूड पॉयझनिंगचा प्रकार आहे. सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. तीन ते चार लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे.-डॉ. अजय सिंग, संचालक, नंदिनी हॉस्पिटल, कोराडी

टॅग्स :nagpurनागपूर