पायाभूत विकासासाठी २५ कोटी  : महावितरणने तयार केला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:14 PM2019-09-10T22:14:54+5:302019-09-10T22:15:59+5:30

नागपूर शहरातील पायाभूत सुविधेसाठी महावितरणने २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

25 crore for infrastructure development: proposal made by Mahavitran | पायाभूत विकासासाठी २५ कोटी  : महावितरणने तयार केला प्रस्ताव

पायाभूत विकासासाठी २५ कोटी  : महावितरणने तयार केला प्रस्ताव

Next
ठळक मुद्देचार पॉवर ट्रान्सफार्मर लागणार : सुटीच्या दिवशीही होते अधिकारी कामावर

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : महावितरणने शहरातील वीज वितरण व्यवस्थेची जबाबदारी एसएनडीएलकडून अधिकृतरीत्या घेतली असली तरी, महावितरणला सुरुवातीपासून कामकाज करावे लागत आहे. मोहर्रमची सुटी असतानाही महावितरणचे अधिकारी मंगळवारी कामावर होते, हे यावरून सिद्ध होत आहे. त्याचबरोबर शहरातील पायाभूत सुविधेसाठी महावितरणने २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.
महावितरणने तयार केलेल्या प्रस्तावानुसार बिनाकी, कामठी रोड, जयहिंदनगर व सेमिनरी हिल्स येथे पॉवर ट्रान्सफार्मर लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर कार्यालयांना सुद्धा दुरुस्त करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणचे सिव्हील डिपार्टमेंट कार्यालयांचा तपशिल घेत आहे. सुत्रांचे म्हणणे आहे की, पायाभूत विकासासाठी बुधवारी वीज पुरवठा बंद करून काम करण्यात येईल. महावितरणकडून सांगण्यात आले की, लवकरच यासाठी कार्यक्रम तयार केला जाईल. यासाठी मुख्यालयातून सल्ला घेण्यात येईल.
 एसएनडीएलची घेताहेत मदत
महावितरण आठ वर्षानंतर शहरातील वीज वितरणाची जबाबदारी सांभाळणार आहे. यासाठी एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांकडून काही तांत्रिक बाजू समजवून घेण्यात येत आहे. एसएनडीएलने लाईनसह संपुर्ण वितरण प्रणालीचे नकाशे महावितरणकडे सोपविले आहे. परंतु ही संपूर्ण यंत्रणा समजण्यासाठी एक महिना लागणार आहे. या दरम्यान एसएनडीएल सोबत समांतर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 ग्राहकांनी वीज बिल भरल्याची पावती घ्यावी
महावितरणने ग्राहकांना आवाहन केले की, त्यांनी वीज बिल भरण्याची अधिकृत पावती जरूर घ्यावी. ग्राहकांनी एनएनडीएलच्या नावावर कुठलेही आर्थिक व्यवहार करू नये. कंपनीने आवाहन केले की, कुणी एसएनडीएलच्या नावावर पैसे मागत असेल तर त्याची माहिती पोलिसात अथवा एसएनडीएल कार्यालयाला द्यावी. येणाऱ्या बुधवारपासून ग्राहकांना जे बील मिळणार आहे, त्यात एसएनडीएलचे नाव राहणार नाही. वीज बिल हे महावितरणच्या फॉरमॅटमध्ये राहील .

Web Title: 25 crore for infrastructure development: proposal made by Mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.