शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटी हाफकिनच्या खात्यात, औषधींचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:29 IST

शासनाने शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या औषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात अडीच कोटी रुपये हाफकिनच्या खात्यात जमा करून, औषधांची मागणी केली होती. अजूनही हाफकिनकडून औषधांचा पुरवठा झाला नाही. सध्या ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा जोर वाढला आहे. आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा भासत आहे. अशात ग्रामीण आरोग्याची स्थिती बिकट झाली असून, प्रशासन हतबल झाले आहे.

ठळक मुद्देग्रामीण आरोग्य केंद्राची अवस्था : आरोग्य यंत्रणा हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या औषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात अडीच कोटी रुपये हाफकिनच्या खात्यात जमा करून, औषधांची मागणी केली होती. अजूनही हाफकिनकडून औषधांचा पुरवठा झाला नाही. सध्या ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा जोर वाढला आहे. आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा भासत आहे. अशात ग्रामीण आरोग्याची स्थिती बिकट झाली असून, प्रशासन हतबल झाले आहे.वर्षभरापूर्वी शासनाने केंद्रीय पद्धतीने औषधांच्या खरेदीसाठी स्थापन केलेल्या हाफकीन महामंडळाचा गाडा अद्यापही रुळावर न आल्याने औषधांची कोट्यवधीची खरेदी प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना औषध कोंडीला सामोरे जावे लागत आहे. नागपूर जिल्ह्यात गावागावात साथीचा आजाराचा उद्रेक झाला आहे. डेंग्यू, स्क्रब टायफस, मलेरियासारखे आजाराचे रुग्ण दररोज वाढत आहे. स्क्रब टायफस या जीवघेण्या आजाराने नागपूर जिल्ह्यातील २१ जण बाधित झाले असून, यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण जनतेच्या आरोग्याची परिस्थिती बिकट झाली असताना, जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे संचालित ग्रामीण आरोग्य केंद्र, उपकेंद्रात औषधांचा तुटवडा कमालीचा भेडसावत आहे. मे महिन्यापासून औषधांसाठी जिल्हा परिषदेने अडीच कोटी रुपये हाफकिनच्या खात्यात जमा केले आहे. अजूनही औषधांचा पुरवठा जिल्हा परिषदेला झालेला नाही. आज ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा भासत आहे. जिल्हा परिषदेची आरोग्याच्या बाबतीत निधीची तरतूद अत्यल्प आहे. जिल्हा परिषदेचा औषधांचा राखीव साठा संपण्याच्या मार्गावर असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी मान्य केले आहे. सवई यांनी औषधांसाठी दोन वेळा हाफकिनच्या संचालकांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीतसुद्धा हा विषय त्यांनी मांडला. पालकमंत्र्यांनीही हाफकिनच्या संचालकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. परंतु औषधांचा पुरवठा झाला नाही. औषधांचा साठा संपत असल्याने प्रशासन, अधिकारी हतबल आहेत. सध्या उद्भवलेल्या साथीच्या आजाराच्या औषधींच्या पुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेकडे उपकर अनुदानाचे पाच लाख रुपये आहे. या अनुदानातून आम्ही जि.प.च्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२०० रुपये प्रमाणे वाटप केले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार त्यातून खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.डॉ. योगेंद्र सवई, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

टॅग्स :zpजिल्हा परिषदmedicinesऔषधं