२४८ टीसींना ‘पॉस’ मशीनची सुविधा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:16+5:302021-03-13T04:13:16+5:30
नागपूर : प्रवासात अनेकदा प्रवाशांना टीसीकडे रक्कम भरावी लागते. जवळ रक्कम नसल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो. त्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर ...

२४८ टीसींना ‘पॉस’ मशीनची सुविधा ()
नागपूर : प्रवासात अनेकदा प्रवाशांना टीसीकडे रक्कम भरावी लागते. जवळ रक्कम नसल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो. त्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील २४८ टीसींना ‘पॉस’ (पॉईंट ऑफ सेल) मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवासी आपल्या डेबिट, क्रेडिट कार्डने पैसे भरू शकणार आहेत.
स्लिपर कोचमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रवासी एसी कोचमध्ये चढतात. अशा वेळी फरकाची रक्कम त्यांना भरावी लागते. ऐनवेळी पैसे नसल्यामुळे त्यांना गाडीखाली उतरावे लागते. मात्र, यापुढे आता प्रवासी टीसींनी मागितलेली दंडाची रक्कम पॉस मशीनच्या साह्याने डेबिट किंवा क्रेडिट कार्डने भरू शकणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील २४८ टीसींना पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहरा यांच्या देखरेखीत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विभागात या मशीनद्वारे आतापर्यंत १ लाख १६ हजार ४२५ रुपयांचा महसूल मिळविण्यात आला आहे. ही सुविधा प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरत असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
................