विसर्जनसाठी २४८ कृत्रिम टँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST2021-09-12T04:11:32+5:302021-09-12T04:11:32+5:30
दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी १३ टँकची व्यवस्था: तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत यंदा दोन ...

विसर्जनसाठी २४८ कृत्रिम टँक
दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी १३ टँकची व्यवस्था: तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत यंदा दोन लाखाहून अधिक घरगुती तर जवळपास दोन हजार सार्वजनिक मंडळांनी गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. शहरात विविध भागात गणेश विसर्जनासाठी २४८ कृत्रिम टँक लावले जाणार आहे. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी १३ ठिकाणी टँक लावण्यात आले आहेत.
शहरातील तलावात मूर्ती विसर्जनाला प्रतिबंध आहे. भाविकांची विसर्जनासाठी गैरसोय होऊ नये म्हणून शहराच्या विविध भागात २४८ कृत्रिम टँक लावण्याचे नियोजन मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे. गरज वा मागणीनुसार यात वाढ केली जाणार आहे.
दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी शहराच्या विविध भागात १३ कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी कृत्रिम टँकमध्ये मूर्ती विसर्जन करावे, असे आवाहन मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.
...जोड आहे.....